Year Ender 2025 : सर्वसामान्य लोकांसाठी २०२५ हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात केंद्र सरकार आणि वित्तीय संस्थांनी अनेक मोठे निर्णय घेतले, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन आर्थिक जीवनावर झाला आहे. बँकिंग नियम, डिजिटल पेमेंट्स, टॅक्स स्लॅब आणि पेन्शनच्या नियमांमधील बदलांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीला आकार दिला आहे.
१. 'झिरो बॅलन्स' खात्यांना जास्त सुविधारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'झिरो बॅलन्स' खात्यांसाठी सुविधा वाढवण्याची घोषणा केली आहे. या खात्यांवर आता UPI, IMPS, NEFT आणि RTGS सारख्या सर्व डिजिटल पेमेंट सुविधा पूर्णपणे मोफत मिळतील. तसेच, एटीएम कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क लागणार नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी बचत होणार आहे.
२. एका खात्यात ४ नॉमिनीची सोयबँक खातेदारांसाठी नॉमिनेशनचे नियम बदलले आहेत. आता तुम्ही तुमच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त, म्हणजेच ४ पर्यंत नॉमिनी बनवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही प्रत्येक नॉमिनीला तुमच्या रकमेचा किती हिस्सा मिळेल, हे देखील ठरवू शकता.
३. आधार कार्ड अपडेटचे नियम शिथिलआधार कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. आता अनेक महत्त्वाची आधार कार्ड अपडेट्स तुम्ही घरबसल्या ऑनलाइन करू शकता. लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट एक वर्षासाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहे.
४. जुनी पेन्शन योजना लागूयावर्षी १ एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' लागू करण्यात आली आहे. जर सरकारी कर्मचाऱ्याने २५ वर्षांची नोकरी पूर्ण केली, तर त्याला त्याच्या मागील १२ महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन मिळेल.
५. टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदलआयकर नियमांनुसार, 'नवीन कर प्रणाली'मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही उत्पन्न कर भरावा लागणार नाही, ज्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
६. जीएसटी स्लॅबमध्ये कपातकेंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात जीएसटीमध्ये अनेक बदल केले. देशात आता केवळ दोनच प्रमुख जीएसटी स्लॅब असतील ५% आणि १८%. खूप जास्त आलिशान किंवा हानिकारक उत्पादनांवर ४०% पर्यंत जीएसटी आकारला जाईल. या बदलांमुळे ग्राहकांवरील कराचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे.
वाचा - एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १२,३८८ रुपये पेन्शन मिळवा! LIC च्या 'सरल पेन्शन प्लॅन'चे ८ फायदे
७. चेक क्लिअरिंग आणि टीडीएसचे नियम बदललेआता चेक जमा केल्यानंतर, एकाच दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. यामुळे पूर्वी चेक क्लिअर होण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावर टीडीएस कापण्याची मर्यादा १ लाख रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची बचत सुरक्षित राहील.
Web Summary : 2025 saw key financial changes impacting daily life. Zero balance accounts gained benefits. Nomination rules eased. Pension schemes updated. Tax and GST slabs revised, offering relief to many and simplifying processes.
Web Summary : 2025 में कई वित्तीय बदलाव हुए जिनका असर जीवन पर पड़ा। जीरो बैलेंस खातों को फायदा। नामांकन नियम आसान। पेंशन योजना अपडेट। टैक्स और जीएसटी स्लैब में बदलाव से कई लोगों को राहत मिली।