Join us

देशात यंदा आले ४४.४३ अब्ज डॉलर, नेदरलँड आणि जपानकडूनही ओघ वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 03:55 IST

या काळात भारताला सिंगापूरहून सर्वाधिक ११.१७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली. मात्र, २०२२-२३ च्या तुलनेत ती ३१.५५ टक्के कमी आहे.

नवी दिल्ली : जगभरात अनिश्चितता असताना भारतात २०२३-२४ मध्ये ४४.४३ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आली. वास्तविक, वार्षिक आधारावर ती ३.५ टक्के कमी आहे. या काळात भारताला सिंगापूरहून सर्वाधिक ११.१७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली. मात्र, २०२२-२३ च्या तुलनेत ती ३१.५५ टक्के कमी आहे.

सिंगापूरसह मॉरिशस, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात (यूएई), केमॅन आइलँड, जर्मनी आणि सायप्रस यांसह प्रमुख देशांकडून येणाऱ्या एफडीआयमध्ये घसरण झाली. नेदरलँड आणि जपान या देशांतून येणाऱ्या एफडीआयमध्ये मात्र लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.

वित्त वर्ष २०१८-१९ पासून भारतास सिंगापूरहून सर्वाधिक एफडीआय मिळत आहे. त्याआधी २०१७-१८ मध्ये मॉरिशसहून सर्वाधिक एफडीआय मिळाला होता. भारत-मॉरिशस कर संधी सुधारणेनंतर सिंगापूरहून सर्वाधिक एफडीआय भारतात येऊ लागला. २०२४-२५ मध्ये भारतात एफडीआयमध्ये तेजी येईल, असा अंदाज आहे.  

भारतात एफडीआयच्या बाबतीत मॉरिशस दुसऱ्या स्थानी राहिला. मॉरिशसमधून येणारी गुंतवणूक ७.९७ अब्ज डॉलरवरून घसरून २०२३-२४ मध्ये ६.१३ अब्ज डॉलर राहिली. ४.९९ अब्ज डॉलरसह अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे. 

टॅग्स :व्यवसाय