Join us  

दररोज ४ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता; पाहा Vodafone-Idea चे जबरदस्त प्लॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 8:32 PM

Vodafone-Idea : सध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक कंपन्यांकडून देण्यात येत आहेत जबरदस्त ऑफर्स. एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या देत आहेत भन्नाट प्लॅन्स. 

ठळक मुद्देसध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक कंपन्यांकडून देण्यात येत आहेत जबरदस्त ऑफर्स.एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या देत आहेत भन्नाट प्लॅन्स. 

व्होडाफोनआयडिया ही कंपनी ग्राहकांना प्रत्येक प्राईज रेंजमध्ये बेस्ट प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. कंपनी सध्या ग्राहकांना १८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंतचे प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे. यामधील अनेक प्लॅन्समध्ये भरघोस डेटा आणि ओटीटी अॅप्सचं सबस्क्रीप्शनदेखील मिळतं. अनेक ग्राहकांना सध्या २८ आणि ५६ दिवसांचे प्लॅन्सही पसंतीस येत आहेत. पाहुया Vi चे असे काही प्लॅन्स ज्यामध्ये कंपनी ग्राहकांना ४ जीबी पर्यंत डेटा आणि अन्य काही बेनिफिट्स देत आहे.

४४९ रूपयांचा प्लॅन५६ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. याशिवाय या प्लॅनसोबत ग्राहकांना नाईट बेनिफिटही देण्यात येतं. यानुसार ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ या दरम्यान, अनलिमिटेड डेटा वापरण्याची मुभा मिळते. तसंच यामध्ये Vi movies आणि TV क्लासिकचंही सबस्क्रिप्शन मिळतं.   

३९९ रूपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये ग्राहकांना देशात कोणत्याही नेटवर्कवर अनिलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. तसंच या प्लॅन सोबत कंपनी ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि विकेंड डेटा रोलओवरचंही बेनिफिट मिळतं. या प्लॅनसोबत ग्राहकांना ४० रूपयांचं डिस्काऊंट कूपनही देण्यात येतं. याचा वापर तुम्हाला पुढील रिचार्जमध्ये करता येऊ शकतो. 

६०१ रूपयांचा प्लॅन५६ दिवसांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो.तसंच अनिलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचाही लाभ ग्राहकांना देण्यात येतो. या प्लॅनसोबत विकेंड डेटा रोलओव्हरसारख्या सुविधाही देण्यात येतात. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनसोबत एका वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

टॅग्स :व्होडाफोनआयडियाइंटरनेटएअरटेलजिओबीएसएनएलस्मार्टफोन