Join us  

एका स्टेज शो साठी घेते २५ लाख, सपना चौधरीचं संपूर्ण नेटवर्थ ऐकून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 8:57 AM

हरयाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी हिला आज अनेक जण ओळखत असतील.

हरयाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी हिला आज अनेक जण ओळखत असतील. आपला आवाज आणि नृत्यामुळे ती केवळ हरयाणामध्येच नाही तर इतर राज्यांतही प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्येही सपना चौधरीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तिच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं लोक जमतात. तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच आज ती आपल्या २ ते ३ तासांच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये घेते. तिची एकूण संपत्ती कोटींच्या घरात आहे.सुरुवातीला सपना चौधरीला डान्सर नव्हे तर पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं होतं. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. अशा परिस्थितीत सपना चौधरीला डान्सर व्हावं लागलं. सपना चौधरी १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. अशा परिस्थितीत आर्थिक विवंचनेमुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. यामुळे त्यांना घरही गहाण ठेवावं लागलं. हळूहळू संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सपनावर आली. अशा परिस्थितीत त्यांनी कला आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले आणि तिला यात यश मिळत गेलं.मानधनही वाढलंआज सपना चौधरीला संपूर्ण देशात कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. हरयाणातील स्टेज शोमधून तिनं करिअरची सुरुवात केली. त्यातून सपनाला खूप प्रसिद्धी मिळाली. आज ती शो आणि गाण्यांच्या कमाईतून कोट्यधीश झाली आहे. सपना चौधरी सध्या ५० कोटींच्या संपत्तीची मालक आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला. असं म्हटलं जातं की, सपना चौधरीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला स्टेज शोसाठी फक्त ३१०० रुपये मिळत होते. पण हळूहळू डान्समुळे तिची फॅन फॉलोइंग वाढत गेली. यासोबतच त्यांची स्टेज शोचं मानधनही वाढत गेलं.किती मानधनमीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, आज सपना चौधरी स्टेज शो करण्यासाठी २५-५० लाख रुपयांचं मानधन घेते. सोबतच ती एखाद्या कार्यक्रमाला २ ते ३ तास ​​हजेरी लावली तर त्यासाठी ५ लाख रुपये आकारते. सपना चौधरीचा बंगलाही आहे. याशिवाय तिच्याकडे महागड्या कार्सचं कलेक्शनही आहे. याची किंमत आज कोट्यवधींमध्ये आहे.

टॅग्स :सपना चौधरीपैसा