Join us
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटी खातेदारांना SBIच्या 'या' निर्णयाचा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 14:38 IST

खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम 'मिनिमम बॅलन्स'च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15 रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल 2018 पासून सुरू होईल. त्यामुळे देशभरातील तब्बल 25 कोटी खातेदारांना याचा फायदा होणार आहे.  

आमच्या ग्राहकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे बँक रिटेल आणि डिजिटल बॅंकिंगचे एमडी पीके गुप्ता म्हणाले. 

मेट्रो आणि शहरी परीसरातील खातेदारांना मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 50 रूपयांवरून  15 रूपये दंड केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज 40 रुपयांहून 12 रूपये करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज 40 रूपये नाही तर 10 रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँक