Join us  

२0२५ पर्यंत यंत्रे हिसकावतील माणसांचे अर्धे-अधिक काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:27 AM

रोबोट क्रांतीतून ५८ दशलक्ष शुद्ध नोकऱ्या (नेट जॉब) निर्माण होतील, असे एका अभ्यासात म्हटले आहे

नवी दिल्ली : सध्या माणसे करीत असलेल्या कामापैकी अर्ध्यापेक्षा जास्त काम २0२५ पर्यंत यंत्रे करू लागतील, मात्र त्याचवेळी या रोबोट क्रांतीतून ५८ दशलक्ष शुद्ध नोकऱ्या (नेट जॉब) निर्माण होतील, असे एका अभ्यासात म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) हा अभ्यास केला. आॅटोमेशन व रोबोटिक्समुळे येत्या काळात रोजगारांच्या स्थितीत क्रांतिकारक बदल होतील, असे या अहवालात म्हटले आहे. कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या एकूण उपलब्ध कामाच्या तासांपैकी ७१ टक्के काम माणसे करतात तर यंत्रे २९ टक्के काम करतात. २0२२ पर्यंत ५८ टक्के काम यंत्रे करतील तर मानवी हातांनी केवळ ४२ टक्के काम केले जाईल. सरासरी अंदाजानुसार २0२५ पर्यंत किमान ५२ टक्के काम यंत्रांकडून करून घेतले जाईल. डब्ल्यूईएफने म्हटले की, यांत्रिकीकरणामुळे सध्याची कार्यव्यवस्था पूर्णत: विस्कळीत होईल. त्याजागी नवी व्यवस्था येईल. या सर्वेक्षणानुसार, चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञानातून जगात १३३ दशलक्ष नव्या नोकºया निर्माण होतील. ७५ दशलक्ष नोकºया हद्दपार होतील. परंतु एकूण रोजगार वृद्धी सकारात्मक असेल. नोकºयांची गुणवत्ता, स्थान आणि स्वरूप यात लक्षणीय बदल होतील.विशेष स्वरूपाची कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यास कंपन्या प्राधान्य देतील. डाटा विश्लेषक व शास्त्रज्ञ, सॉफ्टवेअर व अ‍ॅप्लिकेशन विकासक आणि ई-कॉमर्स व समाजमाध्यमे विशेषज्ञ या क्षेत्रातील जाणकारांची मागणी वाढेल.  २0 अर्थव्यवस्थांतील १५ दशलक्ष कर्मचाºयांना सामावून घेऊन करण्यात आलेल्याया क्षेत्रात असतील संधीडब्ल्यूईएफचे कार्यकारी अध्यक्ष क्लॉज श्वाब म्हणाले की, कंपन्यांकडून आपल्या कर्मचाºयांना नव्याने प्रशिक्षित करणे, तसेच त्यांच्या कौशल्यात वाढ करणे, या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. श्रमशक्तीच्या रूपांतरणासाठी सरकारने वातावरण उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. मार्केटिंग, इनोव्हेशन मॅनेजर्स आणि ग्राहक सेवाविषयक कामे या क्षेत्रांत माणसांची भूमिका महत्त्वाची राहणारच आहे.

टॅग्स :रोबोटनोकरी