Join us  

1 मेपासून आपल्या आयुष्यात होणार 5 मोठे बदल, वेळीच काळजी न घेतल्यास बसेल फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 9:29 AM

1 मे 2019मध्ये 5 मोठे बदल होणार असून, त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे.

नवी दिल्ली- 1 मे 2019मध्ये 5 मोठे बदल होणार असून, त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं सेव्हिंग खात्याशी संबंधित नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पीएनबी आपली तीन वर्षं जुनी सुविधा बंद करणार आहे. तसेच घरगुती गॅसची नवी किंमत 1मेपासून लागू होणार आहे.  

  • SBI- नवे आर्थिक वर्ष 2019-20चा पहिला महिना लवकरच संपणार आहे. मेमध्येही एसबीआय एक मोठा निर्णय जारी करणार आहे. 1 मेपासून बँकेचं डिपॉझिट आणि कर्जाचं व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेटमध्ये बदल केल्यास बँकेतली जमा असलेली रक्कम आणि कर्जाच्या दरावरही परिणाम होणार आहे. हा नियम लागू केल्यानंतर ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कम आणि कर्जदरावर हा नियम लागू आहे.  
  • PNB-पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. पंजाब नॅशनल बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे की, पीएनबी किटीमधील पैसे 30 एप्रिलपर्यंत खर्च करा किंवा IMPSद्वारे बँकेच्या अकाऊंटमध्ये वळते करा. 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे PNB Kittyमध्ये असलेला पैसा वेळेत न काढल्यास मोठी अडचण होऊ शकते.
  • रेल्वे नियम- ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. 1 मेपासून हा नवा नियम लागू होणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु यासाठी एक अटही घालण्यात आली आहे. अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.
  • तिकीट रद्द केल्यास कापणार नाही शुल्क- एअर इंडियानं एक नवं गिफ्ट दिलं आहे. जर तुम्ही तिकीट रद्द केली, तर तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. हा निर्णय 1 मेपासून लागू होणार आहे. याची माहिती एअरलाइन्सच्या दस्तावेजात देण्यात आली आहे.
     
  • घरगुती गॅसचे दर- दर महिन्यासारखंच 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. तत्पूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी बिना सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपये प्रति सिलिंडरची वाढ केली आहे. तर सबसिडीवाले सिलिंडरच्या किमतीत 25 पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत इंडेनच्या 14.2 किलोच्या बिना सबसिडी सिलिंडरची किंमत 706.50 रुपये झाली असून, मार्च महिन्यापर्यंत याची किंमत 701.50 रुपये होईल. 
टॅग्स :एसबीआयपंजाब नॅशनल बँक