Join us  

हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 8:45 AM

सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर करण्यात आली.

एप्रिल 2016 ते मार्च 2020 या काळात 600हून अधिक भारतीय कंपन्यांना विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून 102 कोटी 2.5 लाख डॉलर (सुमारे 7500 कोटी) स्वरूपात चीनकडून एफडीआय मिळाला आहे, अशी माहिती मोदी सरकारनं संसदेत दिली आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1,600हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक(एफडीआय) मिळाली. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर करण्यात आली.चिनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे ही वस्तुस्थिती आहे का, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत 1,600हून अधिक कंपन्यांना चीनकडून 102 कोटी 2.5 लाख डॉलर (सुमारे 7500 कोटी) थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळाली.या कंपन्या 46 क्षेत्रातील आहेत. यापैकी ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्या, पुस्तकांचे प्रिंटिंग (लिथो प्रिंटिंग उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि विद्युत उपकरणांच्या कंपन्यांना या काळात चीनकडून 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त एफडीआय प्राप्त झाला. आकडेवारीवरून असे दिसून येत की, ऑटोमोबाईल उद्योगाला चीनकडून सर्वाधिक 172 दशलक्ष डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळाली. सेवा क्षेत्राला 13.96 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक मिळाली. राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय चिनी एजन्सींनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती ठेवत नाही. 

टॅग्स :चीनभारतभारत-चीन तणाव