Join us

शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:05 IST

pahalgam terror attack : सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह अनेक लोकांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.

pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह अनेक लोकांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि यूट्यूब हे पाकिस्तानी लोकांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. शोएब अख्तर अनेकदा भारतासाठी विधाने करताना दिसतो. या कारवाईनंतर शोएब अख्तरच्या कमाईवर परिणाम होणार आहे. पण, शोएब किती श्रीमंत आहे? तो युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून किती कमाई करत होता? हे माहिती आहे का?

शोएब अख्तर किती कोटींचा मालक'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर निवृत्तीनंतरही लाईम लाईटमध्ये पाहायला मिळतो. पाकिस्तानी टीव्ही चॅनेल्सपासून भारतीय माध्यमांमध्ये शोएबला मानाचं स्थान होतं. यातून त्याने बक्कळ पैसा कमावला असून सध्या त्याची एकूण संपत्ती सुमारे १५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे १९० कोटी रुपये) आहे.

क्रिकेटमधून किती कमाई?१९९७ ते २०११ पर्यंतच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत, अख्तरने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे १६१.३ किमी/ताशी वेगाने गोलंदाजी करण्याचा जागतिक विक्रम. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत, त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पगार, सामना शुल्क आणि बोनसच्या माध्यमातून चांगली रक्कम मिळवली.

शोएब अख्तरचे व्यवसायातून उत्पन्नक्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, अख्तरने समालोचन, टेलिव्हिजन शो आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे आपले उत्पन्न वाढवले. त्याचे यूट्यूब चॅनल देखील खूप लोकप्रिय असून त्यातून तो चांगले उत्पन्न मिळवतो. याव्यतिरिक्त अख्तरने रिअल इस्टेट आणि रेस्टॉरंट व्यवसायातही गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याची संपत्ती वाढली आहे. एका पॉडकास्टमध्ये अख्तर म्हणाला की त्याला पाकिस्तानचा पहिला अमेरिकन डॉलर अब्जाधीश व्हायचे असून ते त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.

पेन्शनमधून उत्पन्नशोएब अख्तरला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कडून दरमहा १,५४,००० पाकिस्तानी रुपये (अंदाजे ४८,१५४ भारतीय रुपये) पेन्शन मिळते. ही पेन्शन त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीसाठी दिले जाते. तो त्याची बहुतेक संपत्ती क्रिकेट, तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि टीव्ही शोमधून कमावतो.

वाचा - डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं

शोएबची यूट्यूबवरून किती कमाईशोएब यूट्यूबवरही सक्रिय आहे. त्याच्या चॅनेलवर त्याचे ६.१२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यातून त्याची चांगली कमाई होते. वेगवेगळ्या सूत्रांनुसार, शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून दरमहा सुमारे ६४ ते ३८८ डॉलर कमावतो. काही अहवालांनुसार त्याचे मासिक उत्पन्न ३२५,६०० डॉलरपर्यंत होते, यावरुन त्याच्या चॅनेलची लोकप्रियता लक्षात येते. आतापर्यंत त्याचे व्हिडिओ ४२ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. शोएब अख्तरचे यूट्यूब चॅनल पाकिस्तानमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूब चॅनलपैकी एक आहे. यात भारतीय प्रेक्षकांचाही मोठा वाटा होता. पण, आता यावर परिणाम होईल.

टॅग्स :शोएब अख्तरपहलगाम दहशतवादी हल्लापाकिस्तानयु ट्यूब