Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५८ रुपयांनी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 05:20 IST

या कपातीनंतर नवी दिल्लीत १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,५२२ रुपये झाली आहे. 

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरनंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही सरकारने कपात केली आहे. १ सप्टेंबर २०२३ पासून ही कपात लागू झाली आहे.  

या निर्णयानुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५८ रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात एक दिवस आधी २०० रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. या कपातीनंतर नवी दिल्लीत १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,५२२ रुपये झाली आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडर