Join us

१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 07:37 IST

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे.

नवी दिल्ली : भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे. एका अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये ई-काॅमर्सची बाजारपेठ जवळपास १६० अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे १३ लाख काेटी रुपयांची हाेईल. बेन ॲंड कंपनीने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे.

अशी झाली वाढ

२१.७ अब्ज डाॅलर

२७.१ अब्ज डाॅलर

३८.० अब्ज डाॅलर

५५.० अब्ज डाॅलर

५६.६ अब्ज डाॅलर

६२.० अब्ज डाॅलर (अंदाजित)

१६० अब्ज डाॅलर (अंदाजित)

जगात रिटेल बाजारातील ऑनलाइनचा वाटा किती?

जागतिक बाजारपेठेचा विचार केल्यास भारतच्या रिटेल बाजारपेठेत ऑनलाइनचा वाटा केवळ ५-६ टक्के आहे.

३५ टक्के सर्वाधिक वाटा चीनचा आहे.

              अमेरिका २४%

              जपान   २४.६%

              ब्रिटन   २६.५%

              चीन    ३५%

              भारत   ५-६%

टॅग्स :व्यवसाय