नवी दिल्ली : जीएसटीद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्यास १२ टक्के व १८ टक्के या दोन कर टप्प्यांचे विलीनीकरण केले जाऊ शकते. तसे झाल्यास भारतात जीएसटीचे दोनच टप्पे राहतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.जेटली यांनी जीएसटीच्या दुस-या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये जेटली यांनी म्हटले की, २० राज्यांच्या महसुलात याआधीच १४ टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे होणाºया नुकसानीबद्दल आता या राज्यांना भरपाई देण्याची गरज नाही. ग्राहकांच्या वापरातील बहुतांश वस्तू १८ टक्के, १२ टक्के आणि ५ टक्के जीएसटीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. जीएसटी परिषदेने मागील दोन वर्षांत अनेक वस्तूंवरील करात कपात केली आहे. त्यामुळे सरकारला ९० हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.जेटली यांनी म्हटले की, घातक वस्तू वगळल्यास अन्य कोणत्याही वस्तूंवर आता २८ टक्के कर नाही. टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकोपयोगी वस्तूंना या टप्प्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे कराचा हा टप्पा संपल्यातच जमा आहे. शून्य आणि ५ टक्के हे टप्पे कायमस्वरूपी राहतीलच.महसूल वाढल्यास १२ व १८ टक्के हे दोन टप्पे एकत्र केले जातील. त्यामुळे जीएसटीचे २ टप्पे राहतील. १२ व १८ टक्के हे दोन्ही टप्पे एकाच वेळी विलीन केल्यास महसुलात घसरण होईल. त्यामुळे हे विलीनीकरण टप्प्याटप्प्याने करायला हवे.महसुलात घटजीएसटीच्या महसुलात जूनमध्ये मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे १ लाख १३ हजार ८६५ कोटी रुपये मिळाले होते, तर मे महिन्यात ती रक्कम होती१ लाख २६८ हजार कोटी रुपये. पण जून महिन्यामध्ये मात्र सरकारला या करातून ९९ हजार ९३६ कोटी रुपये इतकाच महसूल मिळाला.
जीएसटीच्या १२ व १८ टक्के टप्प्यांचे विलीनीकरण शक्य - अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 02:10 IST