Join us  

100 रुपयाची 'ही' नोट विकली जातेय 666 रुपयांना; बघा काय आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:46 AM

भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या अन्य नवीन नोटांपेक्षा या 100 रुपयांच्या नवीन नोटेची चर्चा जर जास्तच रंगली आहे.

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या अन्य नवीन नोटांपेक्षा या 100 रुपयांच्या नवीन नोटेची चर्चा जर जास्तच रंगली आहे. कारण, 100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू आहे.  काही नोटांची तब्बल 666 रुपयांसाठी विक्री केली जात आहे. केवळ एक नोट नाही तर 100 रुपयाच्या नोटांच्या बंडलवरही बोली लावली जात आहे.

हा लिलाव सुरू आहे ebay.com साइटवर.  ebay.comवर एक यादी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये 100 रुपयाच्या नवीन नोटांवर बोली लावली जात आहे. 100 रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त येथे भारतीय चलनातील अन्य नोटांचीही विक्री सुरू आहे. दरम्यान, ज्या नोटांची येथे विक्री सुरू आहे, त्यांना विशेष असे महत्त्व आहे. 

उदाहरणार्थ,  यामध्ये अधिकतर 786 क्रमांकाच्या मालिकांमधील नोटांचा समावेश आहे. तर काही नोटांची सुरुवात 0AAनं होत आहे. 0AA नं सुरुवात होणारी 100 रुपयाच्या नवीन नोटांच्या बंडलची तब्बल 245 डॉलर म्हणजेच 18 हजार रुपयांना विक्री होत आहे. 100 रुपयांच्या नवीन-जुन्या नोटांचीही विक्री सुरू आहे, या नोटांची किमत 11.99 डॉलर म्हणजे जवळपास 884.86 रुपये एवढी आहे. 'ईबे डॉट कॉम' वर केवळ 100 रुपयेच नाही तर एक रुपया, 5 रुपये आणि10 रुपयाच्याही नोटांची विक्री होत आहे. यांची विक्री किमतही जास्त आहे. 

दरम्यान, ईब डॉट कॉम साइटवर कित्येक गोष्टींचा लिलाव सुरूच असतो. या साइटवर तुम्ही सामानांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर बोली लावली जाते. केवळ भारतीय मुद्राच नाही तर कित्येक सामानांचाही लिलाव तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

टॅग्स :नोटाबंदीपैसा