Join us  

नव्या वर्षात मिळणार दहा लाख नोकऱ्या, वेतनवाढ १० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:04 AM

तंत्रज्ञानातील बदलांमुळे या वर्षी अनेक पारंपरिक नोकºयांची जागा नव्या नोक-या घेतील. तथापि, नव्या वर्षात जवळपास १० लाख नव्या नोकºया निर्माण होतील, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली - तंत्रज्ञानातील बदलांमुळे या वर्षी अनेक पारंपरिक नोकºयांची जागा नव्या नोकºया घेतील. तथापि, नव्या वर्षात जवळपास १० लाख नव्या नोकºया निर्माण होतील, असा अंदाज आहे. वेतनवाढ मात्र मागील वर्षीप्रमाणेच राहू शकते. अर्थात, काही क्षेत्रांत नोकरदारांना चांगली वाढ मिळू शकते. तथापि, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दोन वर्षांनंतर उत्साह राहणार असल्याचे संकेत आहेत.नव्या वर्षात होणाºया सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय अनिश्चितता पाहता, नियोक्त्यांकडून २०१९च्या पहिल्या सहा महिन्यांत सतर्कता बाळगली जाऊ शकते. रोजगार निर्मिती हा सध्याचा सर्वात मोठा मुद्दा राहिलेला आहे. कारण व्यापक आर्थिक वृद्धीनंतरही रोजगार निर्मितीची गती अपेक्षेएवढी नाही. दुसरीकडे दरवर्षी १.२ कोटी लोक रोजगार बाजारात प्रवेश करत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.मनुष्यबळ विकास सेवा देणाºया ‘रँडस्टँड इंडिया’चे प्रमुख पॉल ड्यूपुइस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दोन वर्षांनंतर उत्साहराहणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रतिभावंत लोकांची उपलब्धता आणि ई-वाणिज्य क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीमुळे उत्साह राहणार आहे. या वर्षी पायाभूत विकास क्षेत्र, निर्मिती, किरकोळ क्षेत्रातील परिस्थिती चांगली आहे. बँकिंग, आर्थिक सेवा आणि दूरसंचार क्षेत्रात नोकºयांची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही, पण आगामी काळात या क्षेत्रासाठी चांगला असेल.रोजगार वाढतोय?नोव्हेंबर, २०१६ मधील नोटाबंदी आणि १ जुलै, २०१७ ला लागू झालेला जीएसटी या घडामोडीनंतर २०१८ मध्ये भारतीय रोजगार बाजार पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसत आहे. ‘सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट’च्या (एसएचआरएम) सल्लागार विभागाचे प्रमुख निशिथ उपाध्याय यांच्या मतानुसार, सार्वत्रिक निवडणुकीत रोजगार निर्मिती एक मोठा मुद्दा असणार आहे. तथापि, पहिल्या तिमाहीत संस्था सतर्क पावले उचलतील. त्यामुळे रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होईल.

टॅग्स :नोकरीभारत