Join us

Mastercard Layoffs : मास्टर कार्डमधून १ हजार जणांना मिळणार नारळ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 06:33 IST

Mastercard Layoffs : कंपनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे १ हजार जणांना नारळ देणार आहे, असे ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्डाची सुविधा देणारी मास्टरकार्ड ही कंपनी लवकरच एकूण कर्मचाऱ्यांच्या ३ टक्के कामगारांची कपात करण्याच्या विचारात आहे.

कंपनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे १ हजार जणांना नारळ देणार आहे, असे ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांमधील कर्मचारी कमी होतील. कंपनीने २०२२ पर्यंत ३३ हजार कर्मचारी नियुक्त केले. ६७ टक्के जण अमेरिकेबाहेर काम करतात. 

टॅग्स :बँकव्यवसाय