Join us

१ लाखाचे झाले ३३ कोटी, 'या' स्टॉकने ३३८,०००% रिटर्न देत करुन दिली छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:39 IST

शेअर बाजारानं दीर्घकालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे नशीब बदललं आहे.

Borosil Renewables Share: शेअर बाजारानं दीर्घकालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे नशीब बदललं आहे. असाच एक स्टॉक बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेडचा (Borosil Renewables Share) आहे. ज्यामध्ये गेल्या काही वर्षांत 338,476.92 टक्के परतावा नोंदवला गेला. अशी एक वेळ होती जेव्हा या शेअरची किंमत फक्त 13 पैसे होती. ज्याची किंमत आता 400 च्या पुढे गेला आहे. ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना मोठा परतावा मिळाला आहे.काय करते कंपनी?ही मल्टीबॅगर कंपनी सोलार ग्लास बनवते. 7 नोव्हेंबर 2003 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचा (Borosil Renewables Share) स्टॉक 13 पैशांवर होता. जो आज 440.15 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 338,000% पेक्षा जास्त परतावा दिला.1 लाखांचे झाले 33 कोटीज्या गुंतवणूकदारांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आज 33.35 कोटी रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळाला असता. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट या रिटर्नमध्ये समाविष्ट करण्यात आले नाहीत. शॉर्ट टर्ममध्ये या शेअरनं गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिलाय. पण दीर्घकाळात गुंतवणूकदार श्रीमंत झाले.3 वर्षात 1100 टक्क्यांचा रिटर्नगेल्या तीन वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. 22 मे 2020 रोजी हा स्टॉक 34.55 रुपयांवर होता. या शेअरची किंमत 29 डिसेंबर 2023 रोजी 440.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत या शेअरनं गुंतवणूकदारांना 1155 टक्के परतावा दिला.एका वर्षात निगेटिव्ह रिटर्नएका वर्षाच्या कालावधीत, या शेअरनं गुंतवणूकदारांना 13.11 टक्के नकारात्मक परतावा दिला. एक वर्षापूर्वी 29 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 506.25 रुपये होती. जी आता 439.90 रुपयांवर आली आहे. सहा महिन्यांतही बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक