Mutual Fund SIP Calculator: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. बाजारातील गुंतवणूकदारही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ज्याद्वारे छोटे गुंतवणूकदार सहजपणे मोठे फंड बनवू शकतात. आज जाणून घेऊया सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) परताव्याची गणना कशी करावी. या माध्यमातून मोठा निधी कसा निर्माण करता येईल?
गुंतवणुकीची ही पद्धत लोकप्रिय
एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत बरीच लोकप्रिय आहे. डिसेंबर २०२४ मध्ये २६,४५९ कोटी रुपयांच्या इनफ्लोचा विक्रम झाला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये हा आकडा २५,३२० कोटी रुपये होता. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ही आजकाल किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे.
या पर्यायात छोटे गुंतवणूकदारही गुंतवणूक सुरू करून बचत आणि गुंतवणुकीची सवय लावू शकतात. याअंतर्गत ठराविक अंतरानं ठराविक रकमेतून गुंतवणूक केली जाते. जी मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही असू शकते. यामाध्यमातून एसआयपीत चक्रवाढ व्याजाचा फायदा होत असल्यानं मोठा फंड तयार होतो.
एसआयपी कॅल्क्युलेटर कसं काम करतं?
एसआयपी कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवरील संभाव्य परताव्याचा आगाऊ अंदाज लावू शकतात. तरुणांमध्ये हा पर्याय चांगलाच लोकप्रिय होत आहे. नोकरी सुरू होताच गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. यामाध्यमातून भविष्यातील विविध गरजांनुसार उद्दिष्टे ठरवून गुंतवणूक करून आर्थिक बोजाही टाळता येऊ शकतो.
एसआयपीचा परतावा आपण निवडलेल्या गुंतवणूक योजनेवर आणि बाजारपेठेच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. गुंतवणुकीदरम्यान होणारा खर्चाचं गुणोत्तर आणि एक्झिट लोड कॅल्क्युलेटरमध्ये मोजला जात नाही.
ऑनलाइन एसआयपी कॅल्क्युलेटर
गुंतवणूक करायची असेल तर ऑनलाइन एसआयपी कॅल्क्युलेटरचाही वापर करू शकता. ज्यामध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि अंदाजित व्याजदर, भविष्यात तुम्हाला किती परतावा मिळू शकतो याची माहिती मिळेल.
कशी होते गणना?
एसआयपी कॅलक्युलेटरमध्ये होणारी गणना M = P × ({[1 + i]^n – 1} / i) × (1 + i) या फॉर्म्युलानुसार होते. यामध्ये P म्हणजे तुमच्याद्वारे गुंतवणूक केलेली रक्कम, n म्हणजे महिन्यांची संख्यास i चा अर्थ अंदाजे व्याजदर आणि M म्हणजे गुंतवणूकीवर मॅच्युरिटीवर किती पैसा मिळेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)