Join us

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता? मग सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:50 IST

Systematic Transfer Plan : एसआयपीद्वारे म्युच्युअफ फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसटीपी योजना माहिती हवी. यामुळे तुमच्या नुकसानीचे रुपांतर फायद्यात होईल.

Systematic Transfer Plan :शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. तर तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आपण सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेद्वारे तुम्ही तुमचा निधी एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो. अनेकदा तुम्ही गुंतवत असलेल्या म्युच्युअल फंडात चांगली ग्रोथ होत नसेल तर तुम्ही या योजनेद्वारे दुसऱ्या चांगल्या फंडात पैसे ट्रान्सफर करून अधिक नफा कमवू शकता.

एसटीपी योजना नेमकी कशी काम करते?बाजार कोसळत असताना एसटीपी खूप फायदेशीर ठरते. या योजनेमुळे तुमचे मोठे नुकसान टाळता येते. एसटीपीच्या मदतीने तुम्ही इक्विटी स्कीममधून पैसे काढू शकता आणि डेट स्कीममध्ये ट्रान्सफर करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही डेट स्कीममधून पैसे काढू शकता आणि इक्विटी स्कीममध्ये गुंतवू शकता. पण, यामध्ये एक महत्त्वाची अट आहे. एसटीपीद्वारे तुम्ही फक्त एका म्युच्युअल फंड कंपनीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये निधी ट्रान्सफर करू शकता. तुम्ही एका कंपनीच्या योजनेत जमा केलेला निधी दुसऱ्या कंपनीच्या योजनेत हस्तांतरित करू शकत नाही. किती प्रकारचे एसटीपी आहेत?एसटीपीमध्ये ३ प्रकार आहेत. फ्लेक्सिबल एसटीपी, निश्चित एसटीपी आणि कॅपिटल सिस्टिमॅटीक ट्रान्सफर योजना. जेव्हा एखाद्या सेक्टरमध्ये मोठी घसरण होते. तेव्हा तुमचा तोटा मर्यादित करण्यासाठी तुम्ही एका स्कीममधून दुसऱ्या स्कीमवर स्विच करू शकता. याशिवाय, तुम्ही इक्विटी स्कीममधून ELSS स्कीममध्ये फंड ट्रान्सफर करून टॅक्स देखील वाचवू शकता. ही योजना तुम्हाला जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करते.

नफा वाढवण्यासाठी एसटीपी फायदेशीरकोसळत्या बाजारात एसटीपीद्वारे फंड एका योजनेतून दुसऱ्या योजनेत ट्रान्सफर करुन तुम्ही फक्त नुकसान नाही तर नफाही कमावू शकता. चांगली वाढ होणाऱ्या दुसऱ्या योजनेत पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला अधिक परतावा मिळवण्याची संधी आहे.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार