Join us  

इन्सायडर ट्रेडिंग काय प्रकार आहे ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 10:09 AM

संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सेबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, एएमसी चुकांविरोधात आवाज उठविण्यासाठी व्हिसलब्लोअर यंत्रणा तयार करून पारदर्शकतेला चालना द्यावी, अशी नियामकाची इच्छा आहे.

च्युअल फंडातील 'फ्रंट रनिंग' आणि इनसाइडर ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबीने मंगळवारी मोठी पावले उचलली. त्याअंतर्गत असेट मॅनेजमेंट कंपन्यांना (एएमसी) बाजारातील संभाव्य गैरवापर ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करावी लागेल, असा निर्णय सेबीच्या संचालक मंडळाने घेतला. त्याचबरोबर अशा संस्थात्मक यंत्रणेसाठी म्युच्युअल फंड चालविणाऱ्या एएमसीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व वाढविण्याचा निर्णय मंडळाने घेतला. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सेबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, एएमसी चुकांविरोधात आवाज उठविण्यासाठी व्हिसलब्लोअर यंत्रणा तयार करून पारदर्शकतेला चालना द्यावी, अशी नियामकाची इच्छा आहे. गेल्या दीड महिन्यात सेबीच्या संचालक मंडळाची ही पहिलीच बैठक आहे. शेवटची बैठक १५ मार्च रोजी झाली होती.

काय आहे फ्रन्ट रनिंग?सेबीच्या म्हणण्यानुसार, संस्थात्मक यंत्रणेने एएमसी, डीलर्स, स्टॉक ब्रोकर्स किंवा इतर संबंधित संस्थांद्वारे संभाव्य गडबडीचा शोध घेणे आणि अहवाल देणे अपेक्षित आहे. यात विशिष्ट गडबड ओळखण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आणि शोधण्यासाठी ॲडव्हान्स्ड देखरेख प्रणाली, इंटरनल नियंत्रण प्रक्रिया आणि वाढीच्या प्रक्रियेचा समावेश असावा. 

एएमसीशी संबंधित गैरप्रकारांमध्ये फ्रंट रनिंग, इन्साइडर ट्रेडिंग आणि संवेदनशील माहितीचा गैरवापर यांचा समावेश आहे. जेव्हा एखादा ब्रोकर किंवा गुंतवणूकदार गोपनीय माहितीच्या आधारे कोणत्या व्यापारात सामील होतो, तेव्हा त्याला 'फ्रंट रनिंग' म्हणतात. ही संवेदनशील माहिती आहे जी त्याच्या किंमतीवर परिणाम करते.

ॲक्सिस एएमसी आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांच्याशी संबंधित दोन 'फ्रंट रनिंग' प्रकरणांमध्ये सेबीने जारी केलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अॅक्सिस एएमसी प्रकरणात ब्रोकर-डीलर्स, काही कर्मचारी आणि संबंधित संस्था एएमसीच्या व्यवसायात 'फ्रंट रनिंग'मध्ये सामील असल्याचे आढळले. एलआयसी प्रकरणात एका लिस्टेड इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी 'फ्रंट रनिंग' व्यवहार करत असल्याचे समोर आले होते.

दुरुस्तीला मंजुरी : अलीकडील प्रकरणे विचारात घेऊन संचालक मंडळाने सेबी (म्युच्युअल फंड) नियम, १९९६ मधील दुरुस्तीस मान्यता दिली आहे जेणेकरून एएमसीला संभाव्य बाजारपेठेचा गैरवापर ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक पद्धतशीर संस्थात्मक यंत्रणा स्थापित करण्यास सक्षम केले जाईल.

टॅग्स :शेअर बाजार