Join us  

Mutual Funds मध्ये NAV काय असतं माहितीये? कसं ठरवलं जातं? गुंतवणूकदारांसाठी आहे महत्त्वाचं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:33 AM

तुम्ही म्युच्युअल फंड आणि त्यातील गुंतवणूकीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. परंतु यात अनेकदा NAV हा शब्द वापरला जातो.

तुम्ही म्युच्युअल फंड आणि त्यातील गुंतवणूकीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. परंतु यात अनेकदा NAV हा शब्द वापरला जातो. पण तुम्हाला माहितीये का NAV म्हणजे नक्की काय आणि तो का असतो महत्त्वाचा? NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. म्युच्युअल फंड स्कीमची कामगिरी त्याच्या प्रति युनिट NAV च्या माध्यमातून दर्शवली जाते. प्रति युनिट NAV हे एखाद्या विशिष्ट तारखेला योजनेच्या एकूण युनिट्सच्या संख्येनं भागलेलं योजनेच्या सिक्युरिटीजचं बाजार मूल्य असतं. 

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे शेअर्स किंवा बाँड्स इत्यादी पर्यायांमध्ये गुंतवले जातात. शेअर्सची बाजारभाव दररोज बदलत असतो, त्याचप्रमाणे NAV मूल्य देखील दररोज बदलते.  

Mutual Fund Units = Investment ÷ NAV 

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना (Mutual Fund) नेट ॲसेट व्हॅल्यूची (NAV) गुंतागुंत समजणं फार महत्त्वाचं आहे. जर कोणत्याही व्यक्तीला NAV ची गुंतागुंत समजली असेल तर तो म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम आणि परतावा अगदी सहज काढू शकेल. दरम्यान, नेट असेट व्हॅल्यू (Net Asset Value-NAV) म्हणजे गुंतवणुकीचं बाजार मूल्य. म्युच्युअल फंडमधील (MF) प्रति युनिट गुंतवणुकीच्या आधारावर NAV ठरवले जाते. 

NAV चं कॅलक्युलेश 

प्रति युनिट एनएव्ही काढण्यासाठी म्युच्युअल फंडाकडे एकूण जमा रकमेसह पोर्टफोलिओकील सर्व शेअर्सचा बाजारभाव आणि दायित्व वजा केल्यानंतर जी शिल्लक राहते त्याला युनिटच्या एकूण संख्येनं भागून जी संख्या येते ती एनएव्ही असते. 

NAV = (Assets-Liabilities) / Total Number of Units 

असेट्स मॅनेजमेंट कंपनी कोणत्याही फंडाची NAV प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या अखेरिस निश्चित करत असते. बाजारात असलेल्या ईटीएफची एनएव्ही मार्केटच्या बरोबरीनंच असते.  NAV = (Assets-Liabilities) / Total Number of Units. म्युच्यअल फंडात युनिटची बेस व्हॅल्यू १० रुपये किंवा १०० रुपये असते. फंडाच्या पोर्टफोलिओच्या बाजारभावानुसार युनिटंचं एनएव्ही कमी किंवा अधिक होतं. 

NAV कोणत्याही म्युच्युअल फंड युनिटची वाढ दर्शवते. याचा अर्थ असा की कोणत्या फंडात जर ३० रुपये प्रति युनिट एनएव्हीवर गुंतवणूक केली असेल आणि एका वर्षानंतर युनिटची NAV ६० रुपये युनिट झाली, तर त्या फंडानं १०० टक्क्यांचं उत्तम रिटर्न दिलंय असं मानलं जातं. 

(टीप - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा