LIC vs SBI Life Insurance : एक काळ असा होता की विमा म्हटलं की LIC हेच नाव डोळ्यांसमोर येत होतं. आजही एलआयसी आपली विश्वासार्हता टिकवून आहे. LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. मात्र, हा मुकूट आता फार काळ डोक्यावर राहील असं वाटत नाही. कारण, पहिल्यांदाच SBI Life Insurance ने नियमित प्रीमियम पॉलिसींच्या बाबतीत LIC ला मागे टाकले आहे. डिसेंबरमध्ये या कंपनीचा प्रीमियम एलआयसीपेक्षा जास्त आहे. एसबीआय लाइफने नवीन वैयक्तिक नॉन-सिंगल प्रीमियम पॉलिसींमधून ३,४१६ कोटी रुपये उभे केले, डिसेंबर २०२३ पासून १६.७% वाढले. दुसरीकडे, या विभागातील एलआयसीचे संकलन गेल्या वर्षीच्या ३,१११ कोटी रुपयांच्या तुलनेत १५% घसरून २,६२८ कोटी रुपये झाले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एलआयसीचा प्रीमियम ४० टक्क्यांनी घसरून २२,९८१ कोटी रुपयांवर आला आहे. ग्रुप सिंगल प्रीमियम पॉलिसींमधून सर्वात मोठी घसरण झाली, जी गेल्या वर्षीच्या १७,६०१ कोटींवरून ८,१९१ कोटींवर आली. असे असूनही एलआयसीने डिसेंबर २०२४ मध्ये १३,५२३ कोटी रुपयांच्या एकूण नवीन व्यवसाय प्रीमियमसह सर्वात मोठी कंपनी म्हणून आपली आघाडी कायम ठेवली. जी ३०,२१८ कोटी रुपयांच्या उद्योग प्रीमियमच्या ४४% आहे.
कोणाचा किती वाटाएसबीआय लाइफच्या प्रीमियममध्ये डिसेंबरमध्ये वाढ सुरूच होती. गेल्या महिन्यात ते १५% वाढून ५,३०७ कोटींवर पोहोचले. यामुळे महिन्यासाठी त्याचा बाजार हिस्सा १७.५% पर्यंत वाढला. एप्रिल ते डिसेंबरपर्यंत, एसबीआय लाइफने ९.५% मार्केट शेअर वाढवला, जो HDFC लाइफच्या ८.२% आणि ICICI प्रुडेन्शियल लाइफच्या ५.५% पेक्षा जास्त आहे. संपूर्ण जीवन विमा उद्योगात डिसेंबर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ च्या प्रीमियममध्ये २१% घट झाली. एप्रिल-डिसेंबर कालावधीसाठी LIC चा बाजारातील हिस्सा ५७.४% होता, जो गेल्या वर्षीच्या ५८.८% पेक्षा किंचित कमी होता.