Join us  

LIC पॉलिसी लॅप्स झाली? पुन्हा सुरू करायची आहे? जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 2:42 PM

LIC Policy: प्रीमियम न भरल्यामुळे अनेकांच्या पॉलिसी लॅप्स होतात.

LIC Plan: सध्याच्या काळात प्रत्येकाकडे विमा असणे फार महत्त्वाचे झाले आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी पॉलिसी आहे. पण, अनेकवेळा पॉलिसीचा प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते. अशी लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येते का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्याबद्दल जाणून घेऊया...

एलआयसीची नवीन योजनाभारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने वैयक्तिक पॉलिसींच्या रिव्हायवलसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. LIC ने 31 ऑगस्ट 2023 रोजी आपला 67 वा वर्धापन दिन साजरा केला आणि 1 सप्टेंबर 2023 पासून लागू होणारी विशेष मोहीम मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत, कालबाह्य झालेल्या एलआयसी पॉलिसी सुरू करता येणार आहे.

विमा योग्यतेचे प्रमाणपत्रप्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर एलआयसीकडे विमा योग्यतेचा पुरावा सबमिट करुन आणि विहित दराने व्याजासह सर्व प्रीमियम देय रक्कम भरून, लॅप्स पॉलिसी पॉलिसी सुरू करता येते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, न भरलेले प्रीमियम रक्कम भरुन तुम्ही पॉलिसी सुरू करू शकता. यासाठी एलआयसीने काही नियमदेखील आखले आहेत. 

टॅग्स :एलआयसीव्यवसायपैसागुंतवणूक