Join us

वर्षाला २० रुपयांचा खर्च, २ लाख रुपयांचं कव्हर; कामाची आहे 'ही' मोदी सरकारची स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:33 IST

PM Suraksha Bima Yojana: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या होत्या, ज्यांचा अनेकांना लाभ मिळत आहे.

PM Suraksha Bima Yojana: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या होत्या, ज्यांचा गरीब वर्गातील लोकांना लाभ मिळत आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ही योजना १८ ते ७० वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत २० रुपये वार्षिक प्रीमियम भरल्यास २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. चला जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.

वार्षिक विमा योजना

ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी कव्हरेज प्रदान करते आणि वर्षानुवर्षे नूतनीकरण केलं जातं. ही पात्रता १८ ते ७० वर्षे वयोगटासाठी आहे. ज्यांचं वैयक्तिक बँक किंवा पोस्ट ऑफिस खातं आहे ते या योजनेत नाव नोंदणी करण्यास पात्र आहेत. अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास वार्षिक २० रुपये प्रिमियमवर २ लाख रुपयांचे (अंशत: अपंगत्व असल्यास १ लाख रुपये) अपघाती मृत्यू अपंगत्व कवच मिळतं. या योजनेअंतर्गत नोंदणी खातेदाराच्या बँक शाखा / बीसी पॉईंट किंवा बँकेच्या वेबसाइटवर जाऊन किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याच्या बाबतीत पोस्ट ऑफिसला भेट देऊन केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत दरवर्षी ग्राहकाच्या बँक खात्यातून प्रीमियम ऑटो-डेबिट केला जातो.

जीवन ज्योती विमा योजनेबद्दल

जीवन ज्योती विमा ही एका वर्षाची जीवन विमा योजना आहे जी कोणत्याही कारणास्तव झालेल्या मृत्यूला कव्हर करते. १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती ज्यांचे वैयक्तिक बँक किंवा पोस्ट ऑफिस खातं आहे ते या योजनेत नाव नोंदणी करण्यास पात्र आहेत. वयाची ५० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी या योजनेत सामील होणारे नियमित हप्ते भरल्यावर वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ही योजना सुरू ठेवू शकतात. या योजनेसाठी दरवर्षी ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो.

टॅग्स :सरकार