भारतीय करप्रणालीतकर संकलन वेळेवर आणि पारदर्शकपणे व्हावे, यासाठी विविध नियम आणि प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यातील दोन महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे TDS (Tax Deducted at Source) आणि TCS (Tax Collected at Source). दोन्हींचा उद्देश सरकारला कर संकलनात मदत करणे हा असला, तरी कर कापण्याची पद्धत, वेळ आणि जबाबदारी वेगळी असते.
अनेकदा करदाते या दोन्ही संकल्पना एकसारख्या समजतात, त्यामुळे गोंधळ, दंड किंवा अनुपालनातील चुका होतात. म्हणूनच TDS आणि TCS मधील फरक समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः नोकरदार, व्यावसायिक आणि नव्याने कर स्लॅबमध्ये आलेल्यांसाठी.
TDS म्हणजे काय?
TDS (Tax Deducted at Source) म्हणजे स्रोतावर कर कपात. यात उत्पन्न मिळण्यापूर्वीच ठरावीक टक्केवारीने कर कापला जातो आणि उर्वरित रक्कम प्राप्तकर्त्याला दिली जाते. आयकर कायदा, १९६१ अंतर्गत ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या देयकांवर TDS लागू होतो. सरकार दरवर्षी विविध सेवा/देयकांसाठी TDS दर आणि थ्रेशहोल्ड निश्चित करते.
TDS लागू होणारी देयके (उदाहरणे):
भाडे, रॉयल्टी, तांत्रिक/कन्सल्टिंग सेवा शुल्क, कायदेशीर शुल्क ब्रोकरेज, व्याज इ.
TCS म्हणजे काय?
TCS (Tax Collected at Source) हा विक्रीच्या वेळी विक्रेत्याने खरेदीदाराकडून गोळा करायचा कर आहे. ठरावीक वस्तू/सेवा विकताना विक्रेत्याने TCS गोळा करून सरकारकडे जमा करणे बंधनकारक असते. खरेदीदार हा TCS इनकम टॅक्स रिटर्नमध्ये क्रेडिट म्हणून क्लेम करू शकतो. आयकर कायदा, १९६१ च्या कलम 206C अंतर्गत TCS लागू होतो.
TCS लागू होणाऱ्या वस्तू/सेवा (उदाहरणे):
मद्य, तेंदू पान, स्क्रॅप, खनिजे, काही वाहन/वनउत्पादने इ.
TDS आणि TCS मधील मुख्य फरक
कर कधी लागतो?
TDS: माल/सेवा खरेदीसाठी देयक देताना किंवा देय होताच (जे आधी असेल तेव्हा)
TCS: प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी
कोण जमा करतो?
TDS: देयक करणारी व्यक्ती/संस्था
TCS: माल/सेवा विकणारी व्यक्ती/संस्था
लागू क्षेत्र:
TDS: भाडे, ब्रोकरेज, व्याज, पगाराव्यतिरिक्त देयके इ.
TCS: तेंदू पान, कार, वनउत्पादने, स्क्रॅप इ.
फॉर्म्स:
TDS:
Form 24Q (पगार)
Form 26Q (पगाराव्यतिरिक्त)
Form 27Q (NRI देयके)
TCS: Form 27EQ
जमा/रिटर्न वेळापत्रक:
TDS: साधारणपणे महिन्याच्या ७ तारखेपर्यंत (तिमाही रिटर्नसह)
TCS: संबंधित महिन्याच्या अखेरपासून १० दिवसांत
वेळेवर कर न भरल्यास काय परिणाम?
दंड आणि व्याज
TDS उशिरा जमा: दरमहा १% ते १.५% व्याज/दंड
TCS उशिरा जमा: दरमहा १% व्याज
अतिरिक्त व्याज साधारणपणे दरमहा १.५% (किंवा महिन्याच्या भागासाठी)
अनुपालनाचा ताण
उशिरामुळे दुरुस्त (Revised) TDS/TCS रिटर्न दाखल करावी लागू शकते, ज्यामुळे अनुपालनाचा भार वाढतो.
क्रेडिट रेटिंगवर परिणाम
वारंवार उशीर झाल्यास क्रेडिट रेटिंग घसरू शकते, परिणामी कर्ज/क्रेडिट मिळणे कठीण होऊ शकते.
कायदेशीर कारवाई
आयकर कायदा, १९६१ अंतर्गत प्रोसेक्युशन होऊ शकते ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि मोठा दंडही संभवतो.
Web Summary : TDS and TCS are tax collection methods. TDS deducts tax at the source of income, while TCS collects tax at the point of sale. Understanding their differences regarding applicability, collection time, and responsible parties is crucial to avoid penalties and ensure compliance.
Web Summary : टीडीएस और टीसीएस कर संग्रह के तरीके हैं। टीडीएस आय के स्रोत पर कर काटता है, जबकि टीसीएस बिक्री के समय कर एकत्र करता है। दंड से बचने और अनुपालन सुनिश्चित करने के लिए उनकी प्रयोज्यता, संग्रह समय और जिम्मेदार पार्टियों के बारे में अंतर को समझना महत्वपूर्ण है।