Join us

ITR भरलाय, पण ही अखेरची स्टेप तर बाकी नाही ना? भरावा लागेल ₹५००० दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 15:17 IST

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. आयटीआर भरल्यानंतरही एक महत्त्वाची स्टेप शिल्लक राहते.

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. आयटीआर (income tax return) भरल्यानंतरही एक महत्त्वाची स्टेप शिल्लक राहते. आम्ही तुम्हाला आयटीआर व्हेरिफिकेशनबद्दल बोलत आहोत. आयटीआर व्हेरिफिकेशनशिवाय तुमचा आयकर रिटर्न अपूर्ण मानला जातो. कोणत्याही दंडाशिवाय आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती.

सीबीडीटीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीला आयटीआर दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. गेल्या वर्षी, सीबीडीटीनं आयटीआर व्हेरिफाय करण्याची मुदत १२० दिवसांवरून ३० दिवसांवर आणली होती. जर एखाद्या व्यक्तीनं विहित मुदतीत व्हेरिफिकेशन केलं नाही, तर संबंधित व्यक्तीला लेट फी भरावी लागेल.

आयटीआर व्हेरिफिकेशन ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची पायरी आहे. व्हेरिफिकेशनंनंतरच प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. या स्टेपनंतर ती व्यक्ती आयटीआर परतावा मिळण्यास पात्र ठरते. मी जर एखाद्या व्यक्तीने निश्चित वेळेच्या मर्यादेत आयटीआर व्हेरिफाय केलं नाही, तर त्याचा आयटीआर रद्द मानला जाईल. तसंच, त्याला ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

कसे कराल ई व्हेरिफायआधार OTP द्वारे ई-व्हेरिफिकेशन करता येते. यासोबतच नेट बँकिंगद्वारेही ई-व्हेरिफिकेशन करता येणार आहे. याशिवाय ITR-V कॉपी बंगळुरू कार्यालयात पाठवून देखील व्हेरिफाय केली जाऊ शकते.

टॅग्स :इन्कम टॅक्स