Join us

ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:21 IST

ITR Deadline: आयकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कमाईसाठीची आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

ITR Deadline: आयकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कमाईसाठीची आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही अपडेट जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. ३१ जुलै २०२५ ऐवजी नवीन तारखेमुळे करदात्यांना अतिरिक्त ४५ दिवसांचा वेळ मिळालाय.

तारीख का वाढवली?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) दिलेल्या माहितीनुसार यावेळी आयटीआर फॉर्ममध्ये (जे मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी आहेत) अनेक बदल करण्यात आले आहेत. सिस्टममध्ये हे बदल लागू करण्यासाठी आणि आयटीआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन टूल्स (युटिलिटिज) तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत होता. म्हणून, लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तारीख वाढवण्यात आली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?

कोणती कर प्रणाली निवडायची?

नवीन कर प्रणाली (New Regime): ही कर प्रणाली आता डीफॉल्ट आहे. म्हणजे, जर तुम्ही काहीही सांगितलं नाही, तरी तुमचा परतावा या प्रणालीनुसार मोजला जाईल.

जुनी कर प्रणाली (Old Tax Regime): पगारदार व्यक्ती, जर त्यांना हवx असेल तर, नवीन अंतिम मुदतीपर्यंत (१५ सप्टेंबर २०२५) आयटीआर दाखल करताना जुनी कर प्रणाली निवडू शकतात. यामध्ये अनेक वजावटी उपलब्ध आहेत, जसं की एचआरए, व्याज कपात (गृहकर्ज) इत्यादी. लक्षात ठेवा की जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर (म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ नंतर) आयटीआर दाखल केला (ज्याला 'बिलेटेड रिटर्न' म्हणतात), तर तुम्ही फक्त नवीन कर प्रणालीमध्येच रिटर्न दाखल करू शकता. जुनी प्रणाली निवडण्याचा पर्याय राहणार नाही.

'१२ लाखांपर्यंत कर नाही'बद्दल काय?

येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सरकारनं अलीकडेच जाहीर केलंय की २०२५-२६ आर्थिक वर्षात (म्हणजे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतचे उत्पन्न) १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, परंतु हा नियम सध्याच्या आयटीआर फाइलिंगवर (आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी) लागू होत नाही. ही सुविधा पुढील वर्षी उपलब्ध असेल, जेव्हा तुम्ही एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंतच्या उत्पन्नाचे रिटर्न भराल त्यावेळी तुम्ही यानुसार रिटर्न भरू शकता.

टॅग्स :इन्कम टॅक्ससरकार