Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्स टेन्शन सोडा! 'न्यू टॅक्स रिजीम'मध्ये असा वाचवा तुमचा पगार; पाहा ३ जबरदस्त ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:11 IST

Budget 2026 India : जर तुम्हीही प्राप्तीकर भरत असाल तर ही बातमी खूप उपयुक्त ठरू शकते. आज, आम्ही तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही तुमचा कर वाचवू शकता.

Budget 2026 India : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर केला आहे. यात करदात्यांच्या अपेक्षेप्रमाणे सवलत न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. पण तुम्ही 'नवीन कर प्रणाली' निवडली असेल, तर निराश होण्याची गरज नाही. अशा काही कायदेशीर पळवाटा आणि तरतुदी आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा प्राप्तिकर लक्षणीयरीत्या कमी करू शकता किंवा अगदी शून्यही करू शकता.

१. कॉर्पोरेट NPS : टॅक्स वाचवण्याचे 'ब्रह्मास्त्र'कलम 80CCD(2) हा टॅक्स वाचवण्याचा एक प्रभावी पण फारसा चर्चिला न जाणारा मार्ग आहे. जर तुमचा नियोक्ता तुमच्या मूळ पगाराच्या १४ टक्क्यांपर्यंत रक्कम तुमच्या एनपीएस खात्यात जमा करत असेल, तर ती संपूर्ण रक्कम करमुक्त असते. नवीन कर प्रणालीमध्ये हा सर्वात मोठा फायदा आहे, ज्यामुळे तुमचा करपात्र पगार मोठ्या प्रमाणात कमी होतो.

२. होम लोन आणि भाड्याचे उत्पन्नजर तुमच्याकडे स्वतःचे घर असेल आणि ते तुम्ही भाड्याने दिले असेल, तर नवीन कर प्रणालीत तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. भाड्याने दिलेल्या मालमत्तेवर तुम्ही जे गृहकर्जाचे व्याज भरता, ते तुम्ही भाड्याच्या उत्पन्नाशी 'ॲडजस्ट' करू शकता. जितके तुमचे भाड्याचे उत्पन्न आहे, तितक्याच व्याजाची सवलत तुम्ही घेऊ शकता. जर भाड्याचे उत्पन्न व्याजापेक्षा जास्त असेल, तर उरलेल्या रकमेवर टॅक्स भरावा लागेल.

३. रीइंबर्समेंट : सॅलरी स्ट्रक्चरमधील 'स्मार्ट' बचततुमच्या पगारातील काही भाग 'रीइंबर्समेंट' स्वरूपात घेतल्यास तुमची करपात्र उत्पन्न मर्यादा खाली येते. यासाठी तुम्ही खालील बिलं सादर करू शकता.

  • जेवण कूपन : महिन्याला २२०० ते ३००० रुपयांचे कूपन घेतल्यास वर्षाला ३६ हजार रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त होते. २०% टॅक्स स्लॅबमध्ये असणाऱ्यांसाठी ही थेट ७२०० रुपयांची बचत आहे.
  • कार आणि ड्रायव्हर अलाउन्स : अनेक कंपन्या या अंतर्गत वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत रीइंबर्समेंट देतात. यामुळे तुमचा टॅक्स सुमारे ३० हजार रुपयांनी कमी होऊ शकतो.
  • इतर खर्च : पुस्तके, फोन, इंटरनेट, युनिफॉर्म आणि वैद्यकीय खर्चाच्या बिलांच्या बदल्यात तुम्ही वर्षाला १.२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त करू शकता.

वाचा - गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी 'गोल्डन' टीप; ५० लाखांच्या लोनवर अशी करा लाखोंची बचत

थोडक्यात गणितजर तुम्ही कॉर्पोरेट एनपीएस, होम लोन व्याज आणि विविध रीइंबर्समेंटचा योग्य मेळ घातला, तर ५ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न तुम्ही कायदेशीररीत्या करपात्र मर्यादेच्या बाहेर ठेवू शकता. यामुळे नवीन कर प्रणालीतही तुमचा टॅक्स 'झिरो' किंवा अत्यंत कमी होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : New Tax Regime: Save Salary with These 3 Smart Tricks!

Web Summary : Budget 2026 offers new tax regime benefits. Reduce taxable income using corporate NPS, home loan interest adjustments on rental income, and reimbursements for meals, car allowance, and other expenses. Legally minimize tax liability, potentially reaching zero with smart planning.
टॅग्स :इन्कम टॅक्सआयकर मर्यादाअर्थसंकल्प २०२६बजेट माहिती