Join us

सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:34 IST

New Income Tax Bill: केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये नवीन आयकर विधेयक आणले होते.

New Income Tax Bill: केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये नवीन आयकर विधेयक आणले होते. मात्र, आता आज हे विधेयक मागे घेण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये लोकसभेत मांडल्यानंतर ते विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात आले होते. निवड समितीच्या सर्व सूचना स्वीकारल्यानंतर, आता सरकार एक नवीन विधेयक आणणार आहे.

नवीन विधेयक कधी सादर केले जाईल?केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत हे नवीन विधेयक सादर केले आणि त्याच दिवशी ते निवड समितीकडे छाननीसाठी पाठवले होते. समितीने २२ जुलै २०२५ रोजी संसदेत आपला अहवाल सादर केला. या नवीन अपडेटेड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. त्यानुसार, हे नवीन विधेयक सोमवारी (११ ऑगस्ट २०२५) लोकसभेत सादर केले जाईल.

टॅक्स स्लॅबमध्येही बदल होणार?हे विधेयक ६ दशके जुने आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याचा आढावा घेत अनेक सुधारणा केल्या आहेत. नवीन प्राप्तिकर विधेयकाबाबत सर्वात मोठा प्रश्न स्लॅबबद्दल आहे. नवीन विधेयकात टॅक्स स्लॅब बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. विभागाच्या मते नवीन विधेयकाचा उद्देश भाषा सोपी करणे आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकणे आहे.

संसदेतून मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक मागे घेण्यात आले?अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज निवड समितीच्या अहवालानुसार प्राप्तिकर विधेयक, २०२५ मागे घेण्याची परवानगी मागितली. सभागृहाच्या मंजुरीनंतर त्यांनी प्राप्तिकर विधेयक मागे घेतले. निवड समितीने असे सुचवले की, आयटीआर दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेनंतरही करदात्यांना कोणत्याही दंडात्मक शुल्काशिवाय टीडीएस परतावा मागण्याची परवानगी देण्यात यावी.

टॅग्स :इन्कम टॅक्सआयकर मर्यादानिर्मला सीतारामनकेंद्र सरकार