ICAI Quiz 2026 : आपल्या कष्टाच्या पैशांची योग्य बचत आणि गुंतवणूक कशी करावी, हे शिकण्याची सुवर्णसंधी आता केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या फायनान्शिअल आणि टॅक्स लिटरेसी डायरेक्टोरेटने MyGov प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने 'ग्रो अँड गार्ड युअर मनी-क्विझ' सुरू केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना केवळ आर्थिक धडेच मिळणार नाहीत, तर रोख बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
काय आहे ही स्पर्धा?आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या क्विझमध्ये पैशांचे व्यवस्थापन, बचत आणि कर नियोजन यावर आधारित प्रश्न विचारले जातात. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?
- सर्वप्रथम MyGov च्या अधिकृत पोर्टलवर जा.
- तिथे 'Grow and Guard Your Money-Quiz' या लिंकवर क्लिक करून 'प्ले क्विझ' निवडा.
- तुम्हाला एकूण १० प्रश्न विचारले जातील.
- हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे ५ मिनिटांचा (३०० सेकंद) वेळ असेल.
विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसेया स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख रकमा देऊन गौरविण्यात येईल. प्रथम क्रमांकास १०,००० रुपये, द्वितीय येणाऱ्यास ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५,००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
नियम आणि अटी
- कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत विनामूल्य सहभागी होऊ शकतो.
- स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित स्पर्धकाला बाद केले जाईल.
- या स्पर्धेबाबतचे सर्व अधिकार आणि अंतिम निर्णय ICAI आणि MyGov कडे सुरक्षित असतील.
Web Summary : The Indian government, with ICAI, offers a quiz to boost financial literacy. Participants can win up to ₹10,000 by answering questions on money management, saving, and tax planning on the MyGov platform. Open to all Indian citizens.
Web Summary : भारत सरकार, ICAI के साथ, वित्तीय साक्षरता को बढ़ावा देने के लिए एक क्विज प्रदान करती है। प्रतिभागी MyGov प्लेटफॉर्म पर धन प्रबंधन, बचत और कर योजना पर सवालों के जवाब देकर ₹10,000 तक जीत सकते हैं। सभी भारतीय नागरिकों के लिए खुला।