Join us
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपूर्वी करा 'टॅक्स हार्वेस्टिंग'; लाखोंचा टॅक्स वाचविण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:37 IST

गुंतवणूकदारांना नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

टॅक्स सेव्हिंग:  आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर ३१ मार्चपूर्वी 'टॅक्स हार्वेस्टिंग'चा पर्याय निवडून तुम्ही तुमचा आयकर मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. यंदाच्या नियमांनुसार १.२५ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असल्याने, गुंतवणूकदारांना नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

मात्र, टॅक्स हार्वेस्टिंगसाठी शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी होणे गरजेचे आहे. इंट्रा-डे व्यवहार यासाठी ग्राह्य धरले जात नाहीत.

'टॅक्स हार्वेस्टिंग' म्हणजे?

टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स किंवा म्युच्युअल फंड युनिट्सची अशा पद्धतीने विक्री करणे, ज्यामुळे तुमचे करदायित्व कमी होईल. यामध्ये दोन प्रकार येतात :

टॅक्स गेन हार्वेस्टिंग: वार्षिक १.२५ लाख रुपयांच्या करमुक्त मर्यादेचा लाभ घेण्यासाठी नफा बुक करणे.

टॅक्स लॉस हार्वेस्टिंग: झालेला नफा 'सेट-ऑफ' करण्यासाठी तोट्यातील शेअर्स विकून कर कमी करणे ही यात समाविष्ट आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tax Harvesting Before March 31st: Save Lakhs in Taxes!

Web Summary : Maximize tax savings by leveraging tax harvesting before March 31st. Sell shares or mutual funds strategically to utilize the ₹1.25 lakh tax-free profit limit, offsetting gains with losses. Remember, delivery-based transactions are crucial for eligibility.
टॅग्स :इन्कम टॅक्स