Join us

IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:20 IST

bcci dont pay tax : आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणारी बीसीसीआय सरकारला एक रुपयाही कर देत नाही. तरीही सरकार आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कसे कमावते?

bcci dont pay tax : या महिन्याच्या २२ मार्चपासून आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात महागडी आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग आहे. कारण, इथं अक्षरशः पैसांचा पाऊस पडतो. आयपीएल ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही तर एक मोठा उद्योग बनला आहे. जिथे दरवर्षी खेळाडूंपासून संघ मालक, प्रसारण कंपन्या आणि सरकारपर्यंत प्रत्येकजण प्रचंड पैसा कमावतो. या लीगवर भारत सरकारला प्रत्यक्ष कर मिळत नसला तरी अप्रत्यक्षपणे सरकारच्या तिजोरीत भरमसाठी पैसा जमा होतो.

आयपीएलमध्ये कशी कमाई होते?आयपीएलची बहुतांश कमाई मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग हक्कांमधून येते. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा यांनी मिळून २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी आयपीएलचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. यासाठी त्यांनी ४८,३९० कोटी रुपयांचा करार केला आहे. अशा परिस्थितीत आयपीएल दरवर्षी १२,०९७ कोटी रुपये कमवते. आता ही रक्कम BCCI आणि फ्रँचायझी यांच्यात ५०-५० टक्के विभागली गेली आहे.

BCCI सरकारला टॅक्स देत नाहीदरवर्षी १२ हजार कोटी रुपये कमावत असतानाही बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही. आयपीएलच्या प्रचंड कमाईवर भारत सरकार थेट कर वसूल करत नाही. बीसीसीआयने कर द्यावा की नाही? हे प्रकरण २०२१ साली आयकर अपील न्यायाधिकरणा (Income Tax Appellate Tribunal) समोर आलं होतं. त्यावेळी आयपीएल आयोजित करण्याचा उद्देश क्रिकेटला प्रोत्साहन देणे आहे, असा युक्तीवाद बीसीसीआयच्या वतीने करण्यात आला. बीसीसीआयचे हे अपील स्वीकारले. तेव्हापासून बीसीसीआय आपल्या आयपीएल कमाईवर सरकारला कोणताही कर भरत नाही.

अप्रत्यक्ष सरकारची मोठी कमाईआयपीएलला करातून सुट दिल्याने सरकारला थेट महसूल मिळत नाही. पण, इतर अनेक मार्गांनी सरकारच्या तिजोरीत मोठी कमाई येते. खेळाडूंच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या टीडीएसमधून सरकारला भरपूर कमाई होते. २०२५ च्या मेगा लिलावात १० संघांनी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. या कालावधीत १२० भारतीय आणि ६२ विदेशी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. आता या खेळाडूंना मिळणाऱ्या पगारातून सरकार कर वसूल करते. यासाठी सरकार भारतीय खेळाडूंच्या पगारावर १०% TDS आणि परदेशी खेळाडूंच्या पगारावर २०% TDS घेते असा नियम आहे. अशा प्रकारे IPL २०२५ मध्ये सरकारला ८९.४९ कोटी रुपयांचा कर मिळाला.

वाचा - आयपीएलमध्ये विराट कोहलीला मिळाले २१ कोटी, पण हातात येणार फक्त १३; ८ कोटी कुठे जाणार?

समजा जर ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू असेल आणि त्याला २७ कोटी रुपये पगार मिळत असेल तर त्याला त्यावर १० टक्के कर म्हणजेच २.७ लाख रुपये भरावे लागतील.

आयपीएलमध्ये कमाईचे अन्य मार्ग

  • प्रायोजकत्व : प्रायोजकत्व डिल हे आयपीएलसाठी उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. आयपीएलमध्ये वेगवेगळे ब्रँड त्यांच्या ब्रँडिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात.
  • स्टेडियम तिकीट विक्री : फ्रँचायझी आणि सरकार दोघांनाही सामन्यांदरम्यान तिकीट विक्रीतून कमाई होते.
  • वस्तूंची विक्री : जर्सी, कॅप्स, स्टिकर्स आणि क्रिकेटच्या इतर वस्तूंच्या विक्रीतूनही आयपीएलमध्ये चांगली कमाई होते.
  • जीएसटी आणि इतर कर : स्टेडियममध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ, तिकिटे आणि इतर सेवांमधून देखील आयपीएल कमाई करते.
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५आयपीएल लिलावइन्कम टॅक्सकर