Join us  

Cryptocurrency News: क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 1:23 PM

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे लोक रातोरात श्रीमंत होण्याच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील.

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे लोक रातोरात श्रीमंत होण्याच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील. पण काही लोकांनी आपली संपूर्ण कमाईही यात घालवल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे सॅम बँकमन-फ्राइड. क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन फ्रायड यांची निव्वळ संपत्ती एका दिवसात 16 बिलियन डॉलर्सवरून 1 बिलियनवर घसरली. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती 94 टक्क्यांनी घसरली. ब

ब्लूमबर्गच्या मते, अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. मंगळवारी, 30 वर्षीय बँकर फ्रॉईडने घोषणा केली की FTX ला रोखीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे आणि त्याने बायनेंस विकण्याची घोषणा केली होती. याने एफटीएक्सच्या व्हॅल्यूमध्ये मोठी घसरम झाली.

एफटीएक्समध्ये सॅम बँकमन फ्रायड यांचा 53 टक्के हिस्सा आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सजेंच बायनेन्सं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ड्यू डिजिलेंसनंतर आपल्या डीलपासून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. एफटीएक्सने ग्राहकांच्या फंडाचा दुरुपयोग केला आमि अमेरिकन एजन्सी त्यांचा तपास करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एफटीएक्सच्या फायनॅन्शिअल हेल्थबाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि तीन दिवसांमध्ये लोकांनी सहा अब्ज डॉलर्स काढले आहेत.

एका दिवसांत कंगालशेअर्सच्या किंमतीतील चढ-उतरामुळे जगातील श्रीमंत लोकांच्या नेटवर्थमध्ये मोठे चढ उतार दिसून येत असतात. परंतु ही झालेली घसरण नेटवर्थच्या हिशोबानं झालेली सर्वात मोठी घसरण आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रायड यांची नेटवर्थ 16 अब्ज डॉलर्स होती. एफटीएक्समध्ये त्यांचा हिस्सा 6.2 अब्ज डॉलर्स होते. तर क्रिप्टो ट्रेडिंग हाऊस Alameda Research मध्ये असलेल्या त्यांच्या हिस्स्याची किंमत 7.4 अब्ज होती. परंतु यात झालेल्या घसरणीनंतर त्यांचं मूल्य एक एक डॉलर्स राहिले आहे.

टॅग्स :पैसाक्रिप्टोकरन्सी