Join us

कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:47 IST

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनबेसचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. कंपनीनं आपण नुकतेच सायबर हल्ल्याचा बळी ठरलो असल्याचा खुलासा केलाय.

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनबेसचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. कंपनीनं आपण नुकतेच सायबर हल्ल्याचा बळी ठरलो असल्याचा खुलासा केलाय. कंपनीला १८० मिलियन डॉलर्सपासून ४०० मिलियन डॉलरपर्यंत आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. या घटनेत ठराविक संख्येत युजर्सची वैयक्तिक माहितीही समोर आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीत कॉइनबेसनं म्हटलं की, ११ मे रोजी त्यांना एका व्यक्तीचा ईमेल आला. त्या मेलमध्ये कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांच्या काही युजर्सच्या खात्यांशी संबंधित डेटाही त्यानं गोळा केला असल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये कॉइनबेसच्या कस्टमर सपोर्ट आणि अकाउंट मॅनेजमेंट सिस्टीमशी संबंधित माहितीचा समावेश होता.

जर प्लॅटफॉर्मनं त्यांना खंडणी दिली नाही, तर ते त्यांना सर्व डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देतील, असंही ईमेलमध्ये लिहिलं होतं. मात्र, धमकी देऊनही मागणी मान्य करण्यात आली नाही आणि त्याचा तपास करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं.

Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं

हॅकर्सनं मागितली खंडणी

हॅकर्सनं कॉईनबेस हॅक केल्यानंतर युजर्सच्या डेटाच्या मोबदल्यात २० मिलियन डॉलर्सची मागणी केली आहे. तसंच ही रक्कम बिटकॉईनमध्ये देण्याची अटही ठेवलीये. जर ही रक्कम दिली नाही, तर त्यांच्या युजर्सना याचे परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी म्हटलंय.

डेटा लीक करण्याची धमकी

नुकत्याच एका ब्लॉग पोस्टमध्ये, कॉइनबेसनं ज्या युजर्सना स्कॅमर्सना पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं गेलं त्यांना ते नुकसान भरपाई देणार असल्याचं म्हटलंय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या उल्लंघनामुळे हॅकर्सना नाव, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्त्यासह वैयक्तिक माहिती देखील मिळाली. याशिवाय त्यांनी सोशल सिक्युरिटी नंबर (शेवटच्या चार अंकी मर्यादित), मास्क बँक खात्याचा तपशील आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट सारख्या अधिकृत ओळखपत्रांचे फोटो मिळवले. या घटनेत कोणत्याही खात्याचे पासवर्ड किंवा प्रायव्हेट की सोबत तडजोड करण्यात आली नसल्याचं कॉइनबेसनं स्पष्ट केलंय.

टॅग्स :बिटकॉइन