Join us  

Yes Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, १ डिसेंबरपासून बंद होणार ‘ही’ सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 8:39 PM

Yes Bank Account Holder Alert : येस बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यासंदर्भात बँकेनं एक मेसेजही पाठवला आहे.

येस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येस बँकेने आपल्या ग्राहकांना एक मेसेजही पाठवला आहे. हा मेसेज येस बँकेच्या एसएमएस बॅलन्स अलर्ट सुविधेबद्दल आहे. येस बँकेने सांगितले की ते एसएमएसद्वारे प्रदान करत असलेली बॅलन्स अलर्ट सेवा बंद करत आहे. तुम्हाला कोणत्याही पॅकेज अंतर्गत बॅलन्स अलर्टची एसएमएस सेवा मिळत असेल, तर तीही १ डिसेंबरपासून बंद होईल. मात्र, तुमचे सबस्क्रिप्शन शिल्लक असल्यास ते पूर्ण होईपर्यंत ही सुविधा सुरू राहणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केलेय.

ग्राहक येस मोबाईल, येस ऑनलाइन, येस रोबोट इत्यादी बँकेच्या ऑनलाइन सुविधा वापरून खात्यातील शिल्लक तपासू शकतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एसएमएस सेवा कस्टमाईज करू शकता. तुम्ही एसएमएस सेवेसाठी नोंदणी करू शकता, बदलही करू शकता, असे बँकेने सांगितले आहे.

असं करावं लागेल रजिस्टर

  • येस बँकेच्या ग्राहकांना आपल्या आयडी आणि पासवर्डच्या मदतीनं ऑनलाइन लॉग इन करावं लागेल.
  • त्यानंतर पेजवर असलेल्या मेन्यूवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर प्रोफाईल मॅनेजवर अलर्ट यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ज्या खात्यात बदल करायचा असेल किंवा रजिस्टर, डिरजिस्टर करायचे असेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर अलर्ट टाईप निवडा. एकदा अलर्ट निवडल्यानंतर ते सेव्ह करा.
टॅग्स :येस बँक