Join us

ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:04 IST

Credit Card Statement : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला ई मेल वर येणार स्टेंटमेंट तपासले पाहिजेत. कारण, एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.

Credit Card Statement : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या ईमेल आयडीवर दर महिन्याला स्टेटमेंट येत असेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँक किंवा कंपनीने या स्टेटमेंटमध्ये संपूर्ण महिन्याच्या व्यवहारांचा तपशील दिलेला असतो. काय खरेदी केले, किती बिल भरले, शुल्क आणि क्रेडिट कार्डवरील व्याज यासह बरीच माहिती असते. पण अनेकजण हे स्टेंटमेंट काळजीपूर्वक वाचून बिल भरत नाही. किंवा बिल भरण्यास विलंब होतो. अशा स्थितीत नुकसानही होऊ शकते. तुमचे कार्डवर संशयास्पद व्यवहार तर झाले नाहीत ना? याचीही माहिती यातून मिळते.

कोणताही संशयास्पद व्यवहार नाही ना?अनेकदा सायबर गुन्हेगार क्रेडिट कार्डद्वारे गैरव्यवहार करतात. अनेकांच्या ते लक्षातही येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला पाठवलेले क्रेडिट कार्ड स्टेटमेंट बारकाईने तपासणे आवश्यक आहे. तुम्ही केलेल्या व्यवहारांव्यतिरिक्त दुसरे व्यवहार तर झाले नाहीत ना? याची खात्री करा.

स्टेटमेंटची तारीखतुमचे स्टेटमेंट कधी जारी केले गेले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये तुमच्या महिन्यात केलेल्या व्यवहारांची माहिती मिळते. तसेच तुमचे मागील बिल निकाली काढण्यास उशीर झाला असल्यास, या तारखेपासून व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे बिल भरण्यासाठी उशीर होणार नाही. परिणामी नाहक आर्थिक भुर्दंड टळेल.

बिल भरण्याची देय तारीखविलंब शुल्क टाळण्यासाठी तुमचे किमान पेमेंट करण्याची ही अंतिम मुदत आहे. लेट फी महागात पडू शकते. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. तुमचे खाते चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी पेमेंट तारखेपर्यंत किमान रक्कम भरणे महत्त्वाचे आहे.

किमान देय रक्कमजर तुम्ही स्वतःला संपूर्ण देय रक्कम अदा करू शकत नसाल तर, कार्ड जारीकर्ते तुम्हाला उशीरा पेमेंट खर्च टाळण्यासाठी किमान पेमेंट भरण्याची परवानगी देतात. तुम्ही सर्व क्रेडिट कार्ड कंपन्यांना देय असलेल्या एकूण शिल्लक रकमेऐवजी प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम भरणे निवडू शकता. हे पेमेंट बँकेला देय असलेल्या एकूण रकमेपेक्षा खूपच कमी असते कारण ते एकूण रकमेच्या केवळ ३% ते ५% असते. जर तुम्ही संपूर्ण थकबाकी भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही फक्त शेवटचा पर्याय म्हणून किमान पेमेंट करावे.

वाढीव कालावधीपेमेंट देय तारखेनंतर, एक वाढीव कालावधी असतो जो एक महत्त्वाचा बफर म्हणून काम करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उशीरा पेमेंट शुल्कासाठी ३ दिवसांची विंडो सेट करते. परंतु क्रेडिट कार्ड कंपन्या सहसा जास्त कालावधी देतात. उशीरा पेमेंट शुल्क टाळण्यासाठी ही अंतिम मुदत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या कालमर्यादेत तुमच्या पेमेंटचे नियोजन केल्यास ऐनवेळी धावपळ होत नाही.

क्रेडिट मर्यादा तुमची क्रेडिट मर्यादा अतिशय महत्त्वाची आहे. क्रेडिट स्कोर सुधरण्यासाठी मर्यादेच्या ३० ते ६० टक्के पर्यंतच खर्च करण्यास आदर्श समजले जाते. उदा. तुमची मर्यादा १ लाख असेल तर ३० ते ६० हजार रुपयांपर्यंतच खर्च करा.

व्यवहारांची माहितीप्रत्येक कार्डधारकाने स्टेंटमेंट मिळताच सर्व व्यवहार तपासले पाहिजेत. क्रेडिट कार्ड वापरकर्ते म्हणून, कोणतीही त्रुटी उद्भवणार नाही याची खात्री करण्यासाठी व्यवहार पूर्णपणे तपासण्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक