नोव्हेंबर २०२५ सुरू होताच सामान्य नागरिक, बँक ग्राहक, क्रेडिट कार्डधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक आणि बँकिंग संदर्भातील नियम बदलणार आहेत. यात बँक खाते आणि लॉकर्ससाठी एकापेक्षा अधिक नॉमिनीची सुविधा, एसबीआय कार्डच्या (SBI Card) शुल्कांमधील बदल, पीएनबी लॉकरच्या भाड्यात कपात आणि जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया आदी महत्वाच्या नियमांचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात १ नोव्हेंंबरपासून काय काय बदलणार...?
आता बँक खात्यासाठी चार नॉमिनी देता येणार -अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग लॉ (संशोधन) अधिनियम, 2025 चे कलम १० ते १३ लागू होणार आहेत. या नवीन नियमांनुसार आता बँक खातेधारकाला एकाऐवजी चार नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येऊ शकतील. महत्वाचे म्हणजे, खातेदाराला हे चारही एकसाथ नियुक्त करता येऊ शकतात अथवा उत्तराधिकाराचा क्रमही निश्चित करता येऊ शकतो. यामुळे खातेधारकाच्या मृत्यूनंतर पैशांच्या दाव्यावरून होणारे वाद आणि विलंब मोठ्या प्रमाणात कमी होणे अपेक्षित आहे.
एसबीआय कार्ड शुल्क -एसबीआयने आपल्या कार्ड शुल्क संरचनेत १ नोव्हेंबरपासून बदल जाहीर केले आहेत. नवी फीस संरचना काही विशेष व्यवहारांसाठी लागू असेल. प्रामुख्याने, शिक्षण संबंधित पेमेंट (जसे की CRED, Cheq, MobiKwik सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे) केल्यास १% शुल्क आकारले जाईल. तथापि, शाळा/महाविद्यालयाच्या वेबसाइटवरून थेट केलेल्या पेमेंटवर शुल्क लागणार नाही. याशिवाय, ₹१,००० पेक्षा जास्त वॉलेट लोडिंग व्यवहारांवरही १% शुल्क लागेल.
पीएनबी लॉकर -पंजाब नॅशनल बँकेने (PNB) लॉकरच्या भाड्यामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. ही सुधारित भाडेदर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.
जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया - केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) (हयात असल्याचे प्रमाणपत्र) जमा करणे अनिवार्य आहे.
NPS मधून UPS मध्ये स्विच होण्याची मुदत - केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधून एकीकृत पेन्शन योजनेत (UPS) स्विच करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.
Web Summary : November brings changes for banking, SBI cardholders, PNB locker users, pensioners. Nominee rules ease, SBI fees adjust, PNB locker rates drop, and life certificate deadlines extend. NPS switch date extended.
Web Summary : नवंबर में बैंकिंग, एसबीआई कार्डधारकों, पीएनबी लॉकर उपयोगकर्ताओं, पेंशनरों के लिए बदलाव। नामांकित नियम आसान, एसबीआई शुल्क समायोजित, पीएनबी लॉकर दरें कम, और जीवन प्रमाण पत्र की समय सीमा बढ़ाई गई। एनपीएस स्विच तिथि बढ़ाई गई।