Join us  

१ एप्रिलपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' ५ नियम, Credit card नियमांचा देखील समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:44 PM

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, की १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित ५ नियमांमध्ये बदल होणार आहेत? जाणून घ्या...

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर एप्रिल महिना सुरू होईल. तुम्हाला माहिती आहे का की १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित ५ नियमांमध्ये बदल होणार आहेत? यामध्ये क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते NPS नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलत आहेत आणि ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे ते आपण जाणून घेऊ. 

NPS साठी नवीन नियम  

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) एनपीएस गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणार आहे. या अंतर्गत, टू फॅक्टर आधारवर आधारित व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली जाईल. हे सर्व पासवर्ड-आधारित युझर्ससाठी अनिवार्य असेल. नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.  

SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल  

काही विशिष्ट कार्डांचा वापर करून तुम्ही जर रेंट पेमेंटकेलं तर त्यावर १ एप्रिलपासून रिवॉर्ड पॉईट्स देण्यात येणार नसल्याचं एसबीआय कार्डनं म्हटलंय. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI कार्ड पल्स यांचा समावेश आहे. त्याच वेळी, काही क्रेडिट कार्डांवर रेंट पेमेंट केल्यास रिवॉर्ड पॉईंट्स मिळणं १५ एप्रिल २०२४ पासून बंद होणार आहे. 

OLA मनी वॉलेट  

१ एप्रिल २०२४ पासून १० हजार रुपयांच्या कमाल वॉलेट लोड मर्यादेसह पूर्णपणे छोट्या पीपीआय वॉलेटवर स्विच करत असल्याचं ओला मनीनं म्हटलंय. कंपनीनं आपल्या ग्राहकांना यासंदर्भात मेसेज करून माहिती दिली आहे. 

ICICI Bank लाऊंज अॅक्सेस 

आयसीआयसीआय बँकेनं लाऊंज अॅक्सेसच्या अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना किमान ३५००० रुपये खर्च करावे लागतील. यानंतरच त्यांच्यासाठी पुढील तिमाहीसाठी एअरपोर्ट लाऊंज अॅक्सेस अनलॉक केला जाईल. 

येस बँक लाऊंज अॅक्सेस 

येस बँकेनं नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाउंज अॅक्सेसच्या पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, पुढील तिमाहीत सर्व ग्राहकांना लाउंजमध्ये अॅक्सेस मिळविण्यासाठी चालू तिमाहीत किमान १० हजार रुपये खर्च करावे लागतील. 

टॅग्स :बँकएसबीआयपैसा