Join us

SBI Customers Alert: SBI च्या 45 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, खात्यातून 147.50 रुपये कट होताहेत? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:29 IST

SBI Customers Alert: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे.

SBI Customers Alert: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आजकाल SBI ग्राहकांच्या खात्यातून 147.50 रुपये कट केल्याचा मेसेज येत आहे. हा मेसेज पाहून अनेक ग्राहक नाराज दिसत आहेत. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर घाबरण्याची गरज नाही. बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का कापत आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

हे कारण आहेबँकेच्या म्हणण्यानुसार, हे पैसे एसबीआयकडून तुम्ही वापरलेल्या एटीएम आणि डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क म्हणून कापले जात आहेत. बँकेकडून दरवर्षी खात्यातून हे 147.50 रुपये कापले जातात. SBI वार्षिक देखभाल शुल्क म्हणून ₹125 आणि ग्राहकांनी वापरलेल्या डेबिट कार्डांसाठी अतिरिक्त 18 टक्के GST आकारते. जर आपण ₹125 ला GST जोडला तर तो ₹147.50 वर येतो. याशिवाय, बँक डेबिट कार्ड बदलण्यासाठी ₹300 + GST ​​देखील आकारते.

ट्रान्झॅक्शन चार्जेसमध्ये बदलSBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने क्रेडिट कार्डशी संबंधित विविध व्यवहारांसाठी व्यवहार शुल्कात सुधारणा केली आहे. SBI कार्डने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले होते की, 15 नोव्हेंबर 2022 पासून 99 रुपये + प्रक्रिया शुल्क आकारला जाईल.

टॅग्स :एसबीआयबँक