Join us

५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:10 IST

2000 Note : १९ मे २०२३ रोजी मध्यवर्ती बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. परंतु, ३.५ वर्षांनंतरही लोकांकडे या गुलाबी नोटा आहेत.

2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अजूनही पूर्णपणे परत आळेल्या नाहीत. नोटाबंदीची घोषणा होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही, सुमारे ५,८१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात मोठे आणि महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे.

९८.३७% नोटा परत आल्यापीटीआयच्या अहवालानुसार, १९ मे २०२३ रोजी आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुमारे ३.५ वर्षांनी, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, लोकांकडे अजूनही ५,८१७ कोटी रुपये मूल्याच्या २००० रुपयांच्या नोटा आहेत. या नोटा परत येणे केंद्रीय बँकेला अपेक्षित आहे. चलनातून बाद केलेल्या नोटांपैकी ९८.३७% नोटा (मूल्यानुसार) केंद्रीय बँकेकडे परत आल्या आहेत. उर्वरित १.६३% नोटा अजूनही लोकांकडेच आहेत.

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली असली तरी, या नोटांची पूर्णपणे वापसी होईपर्यंत त्या कायदेशीर निविदा राहतील, असे स्पष्ट केले होते.

'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत निर्णयनोव्हेंबर २०१६ मध्ये, देशामध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर २००० रुपयांच्या या मोठ्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा झाली, त्यावेळी एकूण ३.५६ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आता हे मूल्य कमी होऊन केवळ ५,८१७ कोटी रुपये इतके राहिले आहे.

देशातील बाजारात इतर मूल्यवर्गाच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर, आरबीआयने १९ मे २०२३ रोजी 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली.

तुम्ही अजूनही येथे नोटा बदलू शकतामे २०२३ मध्ये नोटा चलनातून बाहेर काढल्याच्या घोषणेनंतर, आरबीआयने सुरुवातीला ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व बँकांच्या शाखांमध्ये नोटा बदलण्याची सुविधा दिली होती. मात्र, नोटांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्रीय बँकेने ही प्रक्रिया आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांपर्यंत मर्यादित केली आहे.

वाचा - EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा

या १९ कार्यालयांमध्ये तुम्ही अजूनही नोटा बदलून घेऊ शकताअहमदाबाद, बेंगळूरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम. याशिवाय, लोक इंडिया पोस्टद्वारे आपल्या जवळील पोस्ट ऑफिस कार्यालयातूनही या नोटा आरबीआयच्या कोणत्याही जारीकर्ता कार्यालयाला पाठवून त्या थेट आपल्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा वापरू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹2000 Notes Still Outstanding: Exchange Opportunity Remains Open!

Web Summary : ₹5,817 crore in ₹2000 notes haven't been returned after demonetization. RBI reports 98.37% returned. Exchange at RBI regional offices or deposit via India Post.
टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकबँकिंग क्षेत्र