Join us
Daily Top 2Weekly Top 5

RBI चा मोठा निर्णय! क्रेडिट कार्डवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:37 IST

जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Credit card: क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. Reserve Bank of India (RBI)ने नवीन नियम लागू करत ड्यू डेट चुकल्यावर लगेच पेनल्टी लावण्यावर मर्यादा आणली आहे. आता बँकांना ग्राहकांना ३ दिवसांचा अतिरिक्त ग्रेस पीरियड देणे बंधनकारक असेल.

३ दिवसांचा ग्रेस पीरियड, काय बदलणार?

नवीन नियमानुसार, ड्यू डेट निघून गेल्यानंतर लगेच लेट पेमेंट चार्ज आकारता येणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमची ड्यू डेट ५ तारीख असेल, तर तुम्ही ८ तारखेपर्यंत कोणतीही लेट फी न देता बिल भरू शकता. यामुळे थोडा उशीर झाल्यास ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा येणार नाही.

लेट फी फक्त थकबाकीवरच

RBIच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता लेट फी संपूर्ण बिल रकमेवर नव्हे तर फक्त थकबाकी वरच आकारली जाईल. यामुळे व्याजाचा भार कमी होण्यास मदत होईल.

क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम?

ड्यू डेटनंतर दिलेला ३ दिवसांचा ग्रेस पीरियड संपल्यानंतरच खाते ‘Past Due’ मानले जाईल. म्हणजेच, ३ दिवसांनंतरही बिल न भरल्यास त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.

बँकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक

नवीन नियमांनुसार, बँकांनी लेट फी किंवा इतर अटींमध्ये बदल केल्यास ग्राहकांना किमान एक महिना आधी माहिती देणे आवश्यक असेल. यामुळे ग्राहकांना आर्थिक नियोजन करणे सोपे होईल.

ग्राहकांसाठी काय महत्त्वाचे?

जरी Reserve Bank of Indiaने काही प्रमाणात सवलत दिली असली तरी, वेळेवर बिल भरणेच सर्वात सुरक्षित पर्याय आहे. वेळेवर पेमेंट केल्यास लेट फी, व्याज आणि क्रेडिट स्कोअरवरील नकारात्मक परिणाम टाळता येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : RBI Relaxes Credit Card Late Fees: Key Changes Explained

Web Summary : RBI eases credit card late fee rules, offering a 3-day grace period. Late fees apply only to outstanding amounts, not the total bill. Banks must notify customers of fee changes beforehand. Timely payments remain crucial for maintaining a good credit score.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक