Join us

..तर १ जानेवारीपासून तुमचंही बँक खातं होणार बंद! आरबीआयच्या सर्व बँकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:10 IST

Rbi Rule Change : बँकिंग व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी आरबीआयने ही खाती बंद करण्यास सांगितले आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी आरबीआयचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Rbi Rule Change : १ जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या वर्षात पहिल्या दिवसापासून अनेक आर्थिक गोष्टी बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नवीन वर्षापासून काही नियमांमध्ये बदल करणार आहे. याचा परिणाम देशातील लाखो बँक खात्यांवर होणार आहे. कारण देशाची केंद्रीय बँक ३ प्रकारची बँक खाती बंद करणार आहे. अशी बँक खाती बंद करावीत, अशा कडक सूचना आरबीआयच्या आहेत. यात जर तुमचंही खातं असेल तर काय करावं याची माहिती असणे आवश्यक आहे

ही बँक खाती बंद करण्याचा निर्णय का घेतला?बँकिंग व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी आरबीआयने ही खाती बंद करण्यास सांगितले आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी आरबीआयचा हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे फसवणुकीला आळा बसेल आणि डिजिटलायझेशनला आणखी चालना मिळेल. विशेषत: निष्क्रिय खात्यांमधील संभाव्य धोके आणि सायबर गुन्हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोणत्या प्रकारची खाती बंद केली जातील? भारतीय रिझर्व्ह बँकेने ३ प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निष्क्रिय खाती, चालू नसलेली खाती आणि शून्य शिल्लक खाती बंद केली जातील.

निष्क्रिय खातेज्या खात्यात २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही, अशी खाती डॉर्मेंट अकाउंट किंवा निष्क्रिय मानली जातात. ही खाती सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य आहेत. अशी खाती बंद करून आरबीआय ग्राहक आणि बँकिंग व्यवस्था सुरक्षित ठेवू शकते.

चालू नसलेले खातेगेल्या १२ महिन्यांपासून किंवा त्याहून अधिक काळ निष्क्रिय असलेली खातीही बंद केली जातील. ही खाती सुरक्षित आणि फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमचे खाते निष्क्रियच्या श्रेणीत येत असल्यास, तुम्ही बँकेशी संपर्क साधून ते सक्रिय करू शकता.

शून्य शिल्लक खातेदीर्घकाळ शून्य शिल्लक ठेवणारी खातीही बंद केली जातील. खात्याचा गैरवापर रोखण्यासाठी, आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना बँकेशी सक्रिय संबंध राखण्यास मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तुम्ही ही खाती कशी वाचवू शकता?केवायसी अपडेट करून तुम्ही तुमचे बँक खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवू शकता. तुमचेही असे खाते असल्यास, तुम्ही ताबडतोब बँकेशी संपर्क साधून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुमचे खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवू शकता. केवायसीसाठी तुम्ही ऑनलाइनही संपर्क साधू शकता. यासह, किमान शिल्लक रक्कम राखून आणि व्यवहार सक्रिय ठेवून, तुम्ही तुमचे खाते बंद होण्यापासून वाचवू शकता.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रबँक