Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:23 IST

Bank Website Domain : सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाइन बँकिंग फसवणूक आणि फिशिंग रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा बदल केला आहे. या पावलामुळे बँक ग्राहकांना अधिक सुरक्षा मिळेल.

Bank Website Domain : जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्व मोठ्या बँकांच्या वेबसाइटच्या डोमेन नावांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सायबर फ्रॉड आणि फिशिंगला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत देशातील सर्व बँकांच्या वेबसाइट्स .com किंवा .co.in ने संपत होत्या, पण आता त्या सर्व .bank.in या नवीन आणि सुरक्षित डोमेनवर शिफ्ट झाल्या आहेत.

RBI ने .bank.in डोमेन का अनिवार्य केले?आरबीआयने सायबर सुरक्षेला मजबूत करण्यासाठी आणि विशेषत: ऑनलाइन बँकिंग फसवणूक, म्हणजेच फिशिंग रोखण्यासाठी हा बदल अनिवार्य केला आहे. फसवणूक करणारे बनावट वेबसाइट्स तयार करून ग्राहकांचे पासवर्ड आणि माहिती चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. .bank.in हे सामान्य डोमेन नाही. केवळ आरबीआयकडे नोंदणीकृत आणि पूर्णपणे पडताळणी झालेल्या संस्थांनाच हे प्रीमियम आणि एक्सक्लूसिव्ह डोमेन मिळू शकते. याचा अर्थ, .com किंवा .in डोमेन कोणीही खरेदी करू शकते, पण .bank.in खरेदी करणे शक्य नाही.

ग्राहक फ्रॉडपासून कसे वाचतील?आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता बँकेची खरी वेबसाइट ओळखणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. फिशिंगमध्ये ठग बनावट साइट बनवून ग्राहकांना फसवतात. मात्र, आता डोमेन नेम पाहूनच ग्राहक खरी आणि बनावट वेबसाइट ओळखू शकतील. तुम्ही आता .bank.in डोमेन असलेल्या वेबसाइटद्वारे अधिक सुरक्षित व्यवहार करू शकता.

डेडलाइन आणि अंमलबजावणीआरबीआयने सर्व बँका, पेमेंट ऑपरेटर आणि वित्तीय संस्थांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हे नवीन सुरक्षित डोमेन स्वीकारण्याचा आदेश दिला होता. ही मुदत संपताच जवळपास सर्वच बँकांनी हा बदल एकाच वेळी अपडेट केला आहे. जुन्या .com किंवा .co.in वाल्या साइट्स आता रीडायरेक्ट होतील किंवा बंद केल्या जातील.

वाचा - तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी डोमेन तपासा. फक्त .bank.in डोमेनवरच लॉगइन करा. संशयास्पद लिंक किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता डिजिटल बँकिंग पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Big news for net banking users! Bank website domains changed.

Web Summary : RBI mandates .bank.in domain for banks to curb online fraud. Banks must adopt it by October 2025, enhancing security and easing website identification. Customers should verify domains before logging in.
टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रबँकसायबर क्राइम