Join us

येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:06 IST

Yes Bank SMBC : भारतीय रिझर्व्ह बँकेने जपानमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकिंग गट SMFG च्या युनिट सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) ला येस बँकेतील २४.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

Yes Bank SMBC : खासगी क्षेत्रातील कर्जदाता येस बँकेने शनिवारी जाहीर केले की, भारतीय रिझर्व्ह बँकेनेजपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला (SMBC) येस बँकेत २४.९९% पर्यंत हिस्सेदारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. कोणत्याही जपानी बँकेकडून भारतातील एखाद्या बँकेत केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते.

प्रमुख बँका विकणार हिस्साया प्रस्तावित करारानुसार, एसएमबीसी भारतीय स्टेट बँककडून १३.१९% आणि अॅक्सिस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँक या ७ बँकांकडून मिळून ६.८१% हिस्सा खरेदी करेल.

येस बँकेने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, एसएमबीसीने सुरुवातीला २०% हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण नंतर त्यात ४.९% वाढ करण्याची विनंती केली होती, ज्याला आरबीआयने आता मंजुरी दिली आहे. आरबीआयने असेही स्पष्ट केले आहे की, अधिग्रहणानंतरही एसएमबीसीला येस बँकेचे 'प्रवर्तक' मानले जाणार नाही. ही मंजुरी २२ ऑगस्टपासून १ वर्षासाठी वैध आहे.

बाजारपेठेत मोठी गुंतवणूकसुमोटोमो मित्सुई फायनान्शिअल ग्रुप (SMFG) ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी असलेल्या एसएमबीसीने यापूर्वी १३,४८२ कोटी रुपयांमध्ये येस बँकेची २०% हिस्सेदारी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही भारतातील बँकिंग क्षेत्रात झालेली एक सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक मानली जाते. विश्लेषकांच्या मते, या व्यवहारामुळे भारतीय बँकांमध्ये अशाच मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

वाचा - मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?

आरबीआयचे स्पष्टीकरणकेंद्रीय बँकेने सांगितले की, या खरेदीमुळे येस बँकेच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही. कारण येस बँकेचा कोणताही प्रवर्तक नाही आणि तिचे स्वामित्व पूर्णपणे सार्वजनिक भागधारकांकडे आहे. शुक्रवारी, बीएसईवर येस बँकेचा शेअर ०.८% घसरून १९.२८ रुपयांवर बंद झाला.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकजपानगुंतवणूक