Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएसयू बँक PNB ने जारी केले जून तिमाहीचे निकाल; नेट प्रॉफिटमध्ये बंपर वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 18:11 IST

जून तिमाहीत बँकेचा नफा 159 टक्क्यांनी वाढला.

नवी दिल्ली : देशातील आघाडीची PSU बँक PNB ने शनिवारी आर्थिक वर्ष 2025 च्या जून तिमाहीचे निकाल (PNB Q1 Result) जाहीर केले आहेत. बँकेने जून तिमाहीत 159 टक्के वाढीसह 3251.5 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. एका वर्षापूर्वी, याच तिमाहीत बँकेचा नफा 1255 कोटी रुपये होता.

निव्वळ व्याज उत्पन्नपंजाब नॅशनल बँकेच्या जून तिमाहीतील निव्वळ व्याज उत्पन्नात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे हे उत्पन्न 10447 कोटी रुपयांवर गेले आहे. विशेष म्हणजे, बँकेचे एकूण उत्पन्न 32166 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात वार्षिक आधारावर 12.5 टक्के वाढ झाली आहे.

GNPA-NNPA रेश्यो

जून तिमाहीत बँकेचा GNPA रेश्यो 275 bps होता. यात वार्षिक आधारावर 4.9 टक्क्यांवरुन 7.73 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच, या तिमाहीत NNPA रेश्यो 138 bps राहिला. यात वार्षिक आधारावर 0.60 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

बचत ठेवजून तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेच्या बचत ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 4.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या ही बचत 484387 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, जून तिमाहीत बँकेच्या चालू ठेवी आणि CASA ठेवींमध्ये अनुक्रमे 64702 कोटी रुपये आणि 5.49 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र