PM Mudra Yojna: स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आहे, पण भांडवल नाही. काळजी करू नका. केंद्र सरकार 'प्रधानमंत्री मुद्रा योजना' (PM Mudra Yojana) अंतर्गत उद्योग/व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे.
कर्जाची मर्यादा वाढली...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात पीएम मुद्रा योजनेतील कर्जमर्यादा दुप्पट करून 20 लाख रुपये करण्याची घोषणा केली. यासाठी योजनेत ‘तरुण प्लस’ ही नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी मुद्रा योजनेत कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपये होती.
2015 पासून आजवर किती कर्जवाटप?
मोदी सरकारने 2015 साली पीएम मुद्रा योजना सुरू केली. ही योजना विशेषतः नॉन-कॉर्पोरेट आणि नॉन-अॅग्रीकल्चर व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आहे. एप्रिल 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत 51.37 कोटी कर्जांद्वारे 33.65 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे.
पीएम मुद्रा योजनेतील कर्जाच्या 4 श्रेणी
पीएम मुद्रा योजनेत सरकार चार वेगवेगळ्या कॅटेगरीत कर्ज देते.
शिशु कर्ज: व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंत
किशोर कर्ज: 20 हजार ते 5 लाख रुपये
तरुण कर्ज: 5 लाख ते 10 लाख रुपये
तरुण प्लस कर्ज: 10 लाख ते 20 लाख रुपये
टीप: 10 ते 20 लाख रुपयांचे ‘तरुण प्लस’ कर्ज त्याच लाभार्थ्यांना मिळते, ज्यांनी याआधी तरुण कॅटेगरीतील कर्ज यशस्वीपणे फेडलेले आहे.
व्याजदर आणि हमीबाबत महत्त्वाची माहिती
शिशु कर्जासाठी कोणतीही गॅरंटी किंवा गॅरंटर आवश्यक नाही
कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही
एसबीआयच्या माहितीनुसार, कर्जावरील व्याजदर साधारणतः 9 ते 12 टक्के (EBLR पेक्षा सुमारे 3.25% अधिक)
कर्जासाठी पात्रता
अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे
कोणतीही बँक डिफॉल्ट हिस्ट्री नसावी
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
निवास प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो
व्यवसाय आराखडा (Business Plan)
KYC कागदपत्रे
उत्पन्नाचा पुरावा
अर्ज कुठे आणि कसा कराल?
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी आपल्या जवळच्या बँकेत थेट अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: mudra.org.in
Web Summary : Start your own business! PM Mudra Yojana offers loans up to ₹20 lakh. The 'Tarun Plus' category is introduced. Interest rates are 9-12%. Apply at your nearest bank or online.
Web Summary : अपना व्यवसाय शुरू करें! पीएम मुद्रा योजना ₹20 लाख तक का ऋण प्रदान करती है। 'तरुण प्लस' श्रेणी शुरू की गई है। ब्याज दरें 9-12% हैं। अपने नजदीकी बैंक में या ऑनलाइन आवेदन करें।