Personal Vs Gold Loan: आर्थिक गरज कधीही उद्भवू शकते. अशा वेळी बचत अपुरी पडल्यास अनेक जण कर्ज घेतात. विशेषतः ५ लाख रुपयांसारखी मोठी रक्कम अचानक लागल्यास 'गोल्ड लोन' आणि 'पर्सनल लोन' हे दोन प्रमुख पर्याय डोळ्यासमोर येतात. मात्र, या दोन्हींपैकी नेमका कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
गोल्ड लोन
गोल्ड लोन हा सिक्योर्ड लोन प्रकारात मोडतो. यामध्ये ग्राहक आपले सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतो. बँका किंवा NBFC कडे तारण असल्यामुळे व्याजदर तुलनेने कमी असतो. हे कर्ज कमी कागदपत्रे आणि जलद मंजूर होते. तातडीच्या गरजांसाठी हा पर्याय विशेषतः उपयुक्त ठरतो. छोटे व्यावसायिक किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींनाही हे कर्ज सहज मिळू शकते.
पर्सनल लोन
पर्सनल लोन हा अनसिक्योर्ड लोन प्रकार आहे. यात कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. मात्र, याचे व्याजदर जास्त असते. हे कर्ज मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोर आवश्यक असतो. परतफेडीसाठी साधारणतः २ ते ५ वर्षांचा कालावधी मिळतो, ज्यामुळे EMI कमी ठेवता येते.
गोल्ड लोन vs पर्सनल लोन: काय निवडावे?
दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागतो.
गोल्ड लोनचे फायदे: कमी व्याज, जलद प्रक्रियाजोखीम: वेळेत कर्ज फेडले नाही तर सोने जप्त होऊन लिलाव होऊ शकतो
पर्सनल लोनचे फायदे: तारणाची गरज नाही, जास्त कालावधी मिळतोतोटे: जास्त व्याजदर, क्रेडिट स्कोरवर परिणाम
कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय योग्य?
मेडिकल इमर्जन्सी किंवा अल्पकालीन गरज: गोल्ड लोन अधिक फायदेशीरस्थिर नोकरी, चांगला क्रेडिट स्कोर आणि दीर्घकालीन परतफेड योजना: पर्सनल लोन योग्य
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Summary : Need ₹5 Lakh? Gold loans offer quick access with lower interest, secured by gold. Personal loans require no collateral but have higher rates and depend on credit scores. Choose wisely based on urgency and financial standing.
Web Summary : ₹5 लाख की ज़रूरत है? गोल्ड लोन सोने द्वारा सुरक्षित, कम ब्याज पर त्वरित पहुँच प्रदान करते हैं। पर्सनल लोन में जमानत की ज़रूरत नहीं, लेकिन दरें अधिक हैं और क्रेडिट स्कोर पर निर्भर करती हैं। अपनी आवश्यकतानुसार समझदारी से चुनें।