Join us

झटपट पर्सनल लोन मिळवण्यासाठी या ५ टीप्स फॉलो करा; १० वेळा फोन करण्याची गरज नाही पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:27 IST

Personal Finance : झटपट वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. हे ५ नियम पाळले तर तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही.

Personal Finance : आर्थक संकट सागून येत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर कर्ज घेण्यावाचून पर्याय उरत नाही. आजकाल बाजारात पर्सनल लोन सहज उपलब्ध होत आहे. तुम्हालाही अनेकदा पर्सनल लोन घेण्याच्या ऑफर्स आल्या असतील. सर/मॅडम तुमच्या अकाउंटच्या बेसिसवर तुम्हाला ५ ते १० लाखांचे कर्ज मिळेल. पण, पर्सनल लोन फोन घेण्याइतकं सोपं नाही. यासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा अनेक बाबी तपासल्या जातात. तुमची जर आधीच तयारी नसेल तर झटपट मिळणारे कर्जही उशिरा मिळू शकते. किंवा काहीवेळा तुमचा अर्ज रद्दही केला जाऊ शकतो. 

तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय, तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर झटपट वैयक्तिक कर्ज मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, योग्य कर्जाची रक्कम आणि कालावधी, कागदपत्रे आणि EMI चं  गणित अशा अनेक गोष्टी यासाठी लागतात. जर तुम्ही याची आधीच तयार केली तर अगदी काही तासांत कर्ज तुमच्या खात्यावर जमा होईल.

कर्जाची रक्कम आणि कालावधीकर्ज घेण्यापूर्वी, तुम्हाला किती रक्कम हवी आहे? त्याचा कालावधी काय असावा हे ठरवा. दीर्घ मुदतीचे कर्ज घेतल्यास कर्जाचा हप्ता कमी होतो. परंतु, तुम्हाला एकूण कर्जावर अधिक व्याज द्यावे लागते.

उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत बहुतांश बँका किंवा वित्तीय संस्था केवळ स्थिर उत्पन्न असलेल्या ग्राहकांनाच झटपट वैयक्तिक कर्ज मंजूर करतात. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास, तुम्हाला आयटी रिटर्नसारखी कागदपत्रे दाखवावी लागतील.

क्रेडिट स्कोअरकर्ज देणाऱ्यासाठी क्रेडिट स्कोअर सर्वात महत्त्वाचा असतो. हे कर्ज फेडण्याची तुमची क्षमता दाखवते. वेळेवर बिल भरणे आणि कमी क्रेडिट युटिलायझेशन रेशो यांसारख्या सवयी लावून तुमचा स्कोअर चांगला ठेवा.

कागदपत्रेझटपट वैयक्तिक कर्जासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कमी आहे. परंतु, ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि घरचा पत्ता यांसारखी कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे.

EMI कॅल्क्युलेटरतुम्ही EMI कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या मासिक हप्त्यांचा अंदाज लावू शकता. यामुळे कर्जाची रक्कम आणि ईएमआय ठरवणे सोपे होईल.

गरज असेल तरच वैयक्तिक कर्ज घ्याजेव्हा खूप गरज असेल आणि सर्व पर्याय बंद होतील. तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा विचार करा. कारण, वैयक्तिक कर्ज कोणत्याही कर्जापेक्षा खूप महाग असते. अशा परिस्थितीत अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज घेतल्यास तुमच्यावर कर्जाचे ओझे होऊ शकते. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा