Join us

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? तुम्हाला अडचणीत यायचं नसेल तर 'हे' १० नियम पाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:28 IST

personal finance : एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे फायदेशीर ठरू शकते. पण, जर तुम्ही त्यांचे योग्य व्यवस्थापन केले तरच हे शक्य आहे. अन्यथ कुठून बुद्धी सुचली अन् क्रेडिट कार्ड घेतलं अशी अवस्था होईल.

personal finance : आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्डचा वापर हे केवळ पैसे उधार घेण्याचे साधन राहिले नसून ते एक स्मार्ट आर्थिक साधन बनले आहे. यासोबत तुम्हाला कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि आर्थिक लवचिकता असे अनेक फायदे मिळतात. पण, जर तुम्ही याचा निष्काळजीपणे वापर केला तर ते तुम्हाला कर्जाच्या जाळ्यातही अडकवू शकते. त्यामुळे, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड योग्यरित्या व्यवस्थापित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • खर्चाचा मागोवा ठेवा : प्रत्येक क्रेडिट कार्डच्या खर्चाचे वेगळे रेकॉर्ड ठेवा. तुम्ही प्रत्येक कार्डवर किती खर्च करत आहात आणि तुमची एकूण क्रेडिट मर्यादा किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • वेळेवर बिल भरणे : तुमची सर्व क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरा. वेळेवर पैसे न दिल्याने विलंब शुल्क आणि क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
  • तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा : तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ३०% पेक्षा कमी वापरा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल आणि आर्थिक स्वास्थ्य मजबूत राहील.
  • सर्वात जुने कार्ड बंद करू नका : तुमचे सर्वात जुने क्रेडिट कार्ड नेहमी सक्रिय ठेवा. कारण ते तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत करते.
  • योग्य रिवॉर्ड कार्ड निवडा : तुमच्या खर्चाच्या प्रकारानुसार रिवॉर्ड आणि कॅशबॅक देणारी कार्डे निवडा. याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.
  • उच्च व्याजदर कार्ड बंद करा : ज्या कार्डांवर जास्त व्याज आहे ते आधी फेडा. यामुळे तुमचे कर्ज लवकर दूर होण्यास मदत होईल.
  • फसव्या ऑफर्सपासून दूर राहा : क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही ऑफर किंवा योजना स्वीकारण्यापूर्वी, त्याची सत्यता तपासा.
  • ऑटो-डेबिट वापरा : वेळेवर बिले भरण्यासाठी ऑटो-डेबिट सेट करा. यासह तुमचा पेमेंट चुकणार नाही.
  • तुमच्या क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवा : तुमचा क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासत राहा. हे तुम्हाला तुमच्या आर्थिक आरोग्याविषयी माहिती देईल.
  • आवश्यकतेपेक्षा जास्त कार्डे बाळगू नका : तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापित करू शकता तेवढीच कार्डे ठेवा. जास्त कार्ड ठेवल्याने गोंधळ वाढू शकतो.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकभारतीय रिझर्व्ह बँक