Punjab National Bank Account: तुमचं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएनबीनं आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा जारी केला असून काही ठराविक बँक खाती बंद केली जाऊ शकतात असं म्हटलंय. बँकेनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली. या सूचनेनुसार, संबंधित ग्राहकांना १५ एप्रिल २०२६ पूर्वी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर १६ एप्रिल २०२६ पासून बँक खातं बंद केलं जाईल.
पीएनबी कोणती बँक खाती बंद करणार?
पंजाब नॅशनल बँकेनं स्पष्ट केलंय की, ज्या ग्राहकांच्या खात्यात गेल्या ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यांच्या खात्यातील शिल्लक (बॅलन्स) शून्य (०) आहे, अशा ग्राहकांनी १५ एप्रिल २०२६ पूर्वी शाखेत जाऊन केवायसी करणं अनिवार्य आहे. असं न केल्यास, १६ एप्रिलपासून कोणतीही पूर्वसूचना न देता ही खाती बंद केली जातील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या खात्यांमध्ये २ वर्षांहून अधिक काळ कोणताही व्यवहार होत नाही, त्यांना 'निष्क्रिय' खातं मानलं जातं आणि आता पीएनबी अशी खाती बंद करण्याची प्रक्रिया राबवत आहे.
गुढीपाडव्याला शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? पटापट चेक करा डिटेल्स
काय असतं निष्क्रिय खातं?
आरबीआयच्या वेबसाइटनुसार, ज्या बचत किंवा चालू खात्यामध्ये सलग दोन वर्षांहून अधिक काळ ग्राहकाकडून कोणताही व्यवहार झालेला नाही, त्याला निष्क्रिय खातं म्हटलं जातं. जर तुमचंही पीएनबीमध्ये असं खातं असेल ज्यामध्ये गेल्या ३ वर्षांपासून व्यवहार झालेला नाही, तर तुम्हाला तातडीनं बँकेत जावं लागेल. तिथे आवश्यक कागदपत्रं आणि फॉर्म भरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून खातं पुन्हा सक्रिय न केल्यास, १६ एप्रिल २०२६ पासून तुमचं खातं कायमचं बंद होईल.
Web Summary : PNB warns that accounts with no transactions in 3 years and zero balance will be closed from April 16, 2026, if KYC isn't completed by April 15, 2026. Customers should contact their branch.
Web Summary : पीएनबी ने चेतावनी दी है कि जिन खातों में 3 साल से कोई लेनदेन नहीं हुआ है और शून्य बैलेंस है, उन्हें 16 अप्रैल, 2026 से बंद कर दिया जाएगा यदि 15 अप्रैल, 2026 तक केवाईसी पूरा नहीं किया जाता है। ग्राहक अपनी शाखा से संपर्क करें।