IDFC First Bank Fraud Case : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत, या विश्वासाला तडा देणारी एक मोठी घटना समोर आली आहे. IDFC First Bank च्या चंदीगड शाखेत तब्बल ५९० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा डल्ला बँकेबाहेरील कोणत्या दरोडेखोराने नाही, तर बँकेच्याच काही कर्मचाऱ्यांनी संगनमताने सरकारी खात्यांवर मारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
घोटाळा उघड कसा झाला?हरियाणा सरकारच्या एका विभागाने आपले खाते बंद करून सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत वळवण्याचा अर्ज केला होता. जेव्हा बँकेने कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा सरकारी रेकॉर्डमधील शिल्लक आणि बँकेच्या सिस्टीममधील शिल्लक यात मोठी तफावत आढळली. १८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या तपासात हरियाणा सरकारच्या इतर विभागांच्या खात्यातूनही कोट्यवधी रुपये गायब असल्याचे समोर आले. २१ फेब्रुवारी रोजी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा सुमारे ५९० कोटी रुपयांच्या घरात आहे.
४ कर्मचारी रडारवरया कटाचे धागेदोरे बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेशी जोडलेले आहेत. चंदीगड शाखेतील चार संशयित अधिकाऱ्यांनी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थांशी हातमिळवणी करून हा फ्रॉड केल्याचा बँकेचा संशय आहे. या कर्मचाऱ्यांनी सरकारी निधीला पद्धतशीरपणे इतरत्र वळवले.
बँकेने उचलली कठोर पावलेतपासाला बाधा येऊ नये म्हणून संशयित चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँकेने तातडीने पोलिसात एफआयआर दाखल केला असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एका स्वतंत्र बाह्य यंत्रणेमार्फत 'फॉरेंसिक ऑडिट' केले जाणार आहे. ज्या बँकांमध्ये हा पैसा वळवण्यात आला आहे, त्यांना सूचित करून संबंधित खात्यांवर 'लियन मार्क' म्हणजेच फ्रीझ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाचा - सोन्याचा भाव १.७० लाखांवर जाणार? युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक संकेतांमुळे परिस्थिती बदलणार?
सामान्य ग्राहकांना धोका आहे का?बँकेने स्पष्ट केले आहे की, हा गैरव्यवहार केवळ हरियाणा सरकारशी संबंधित ठराविक खात्यांपुरताच मर्यादित आहे. चंदीगड शाखेतील इतर सामान्य ग्राहक किंवा देशातील इतर शहरांमधील ग्राहकांच्या पैशांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
Web Summary : A ₹590 crore fraud at IDFC First Bank's Chandigarh branch, allegedly by employees, targeting government accounts, has been exposed. An internal audit revealed discrepancies, leading to suspension of officials and a police investigation. Only specific government accounts were affected; general customers remain unaffected.
Web Summary : आईडीएफसी फर्स्ट बैंक की चंडीगढ़ शाखा में कर्मचारियों द्वारा कथित तौर पर सरकारी खातों को निशाना बनाते हुए 590 करोड़ रुपये का घोटाला सामने आया है। आंतरिक ऑडिट में विसंगतियां पाई गईं, जिसके बाद अधिकारियों को निलंबित कर दिया गया और पुलिस जांच शुरू हो गई। केवल विशिष्ट सरकारी खाते प्रभावित हुए हैं; सामान्य ग्राहक अप्रभावित हैं।